महाराष्ट्रात आता 1 गुंठा जमीन खरेदी-विक्री करणे शक्य झाले आहे हिवाळी अधिवेशनात बाबतचे विधेयक मंजूर झाले. निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
काय आहे हे नवीन नियम.?
लवचिकता : आता शेतकरी त्यांच्या जमिनीचे छोटे तुकडे विक्री करू शकतील.
विहिरी, रस्ते : विहिरी बांधणे, शेती रस्ते बनवणे अशा कामांसाठीही जमीन विकत घेता येईल.
सुधारणा : तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करून निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारी योजना : केंद्र-राज्य सरकारच्या ग्रामीण घरकुल योजना साठी ही जमीन खरेदी-विक्री करता येईल.
शेतकऱ्यांना काय फायदा.?
आर्थिक स्थिरता : छोटे शेतकरी आर्थिक अडचणीत असतानाही जमीन विकून पैसे मिळवू शकतील.
विकास :शेती क्षेत्राचा विकास होण्यास मदत होईल.
लवचिकता : शेती पद्धतींमध्ये बदल करण्यासाठी जमीन खरेदी-विक्री करणे सोपे होईल.
प्रक्रिया आणि शुल्क.?
जमीन बाजारमूल्य नुसार फक्त 5% शुल्क भरून 1 गुंठ्याची खरेदी किंवा विक्री करता येईल.
प्रक्रिया सुलभ करून शासकीय योजनेच्या निकषांनुसार मंजुरी दिली जाईल.
जमीन खरेदी-विक्रीला राज्य सरकारची मंजुरी असल्यामुळे कायदेशीर अडथळे दूर होतील.