ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

रानभाजी विक्रीतून रोजगार निर्मिती करणे शक्य. – श्री. लोमेश उसेंडी साहेब, प्रभारी तहसीलदार,मुलचेरा

मुलचेरा:-

 कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व उमेद मुलचेरा यांचे संयुक्त विदयमानाने “ ९ ऑगष्ट जागतिक आदिवासी दिनाच्या “ निमित्ताने आज दिनांक १२/०८/२०२४ रोजी तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन तहसील कार्यालय सभागृह मुलचेरा येथे करण्यात आले.

  कार्यक्रमाला मा. श्री. बसवराज मास्तोळी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा, गडचिरोली , मा. श्री. लोमेश उसेंडी साहेब, प्रभारी तहसीलदार,मुलचेरा, मा.श्री. युधिष्टिर बिस्वास, माजी बांधकाम सभापती जि.प. गडचिरोली, मा. श्रीमती सुवर्णाताई येमुलवार, माजी सभापती पं.स.मुलचेरा, मा.श्री. महेश विधाते, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मुलचेरा, मा.श्री.पि.यु.किलनाके, कृषी अधिकारी पं.स.मुलचेरा, मा.श्री.विकास पाटील,तालुका कृषी अधिकारी मुलचेरा, कु. सोनाली सुतार, मंडळ कृषी अधिकारी, मुलचेरा, मा. श्री. भुषण देवतळे, तालुका व्यवस्थापक, उमेद , मा.श्री. महेश गुडेंटीवार, पत्रकार व कृषी विभागाचे कर्मचारी त्याचबरोबर शेतकरी गटाचे सभासद , महिला शेतकरी व महिला बचत गटांच्या सदस्य मोठया प्रमाणात उपस्थित होते.  

   सर्वप्रथम कार्यक्रमाचे उदघाटन मा. श्री. लोमेश उसेंडी साहेब, प्रभारी तहसीलदार,मुलचेरा यांनी केले. त्यांनी आपले उदघाटनीय भाषनात रानभाज्यांचा आहारामध्ये जास्तीत जास्त वापर करावा व औषधी गुणधर्म जाणुन घेण्याचे सांगुन शेती ही व्यावसायीक पदधतीने करुन तसेच रानभाजी विक्रीतून आपले उत्पन्न वाढवावे असे आवाहण केले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणुन लाभलेले मा. श्री. युधिष्टिर बिस्वास, माजी बांधकाम सभापती, जि.प. गडचिरोली यांनी रानभाज्यांचा आहारात समावेश करावा व शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहण केले. मा. श्रीमती सुवर्णाताई येमुलवार, माजी सभापती पं.स.मुलचेरा यांनी महिलांना प्रत्येक क्षेत्रात भरारी घेण्याचे आव्हान केले. तसेच महिला गटांमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची प्रसंशा केली. मा.श्री. महेश विधाते, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मुलचेरा यांनी रानभाज्यांचे महत्व व या भाज्या काळाची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन श्री. बसवराज मास्तोळी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली हे होते त्यांनी आपले अध्यक्षीय भाषनात रानभाज्यांचे वेगवेगळे पदार्थ तयार करण्यावर भर देणेबाबत मार्गदर्शन केले. रानभाज्यांचे आहारातील महत्व विषयी सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये रानभाज्यांची ओळख, महत्व, आरोग्यास होणारे फायदे, उपयोग, गुणधर्म या विषयी सविस्तर माहिती दिली. 

  तालुका स्तरावरीय रानभाजी महोत्सव निमित्त उत्कृष्ट रानभाजी स्टॉल व रानभाजी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन सदर स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार रु. २००१/-, द्वितीय पुरस्कार रु.१५०१/-, तृतीय पुरस्कार रु.१००१/- देण्यात येणार असल्याची माहिती श्री. विकास पाटील, तालुका कृषी अधिकारी मुलचेरा, यांनी सांगितले. मान्यवरांनी प्रत्येक रानभाजी दालनास भेट देवुन रानभाज्यांची माहिती जाणुन घेतली. सोबतच परीक्षकांनी रानभाजी पाककृती व रानभाज्यांची संख्या, दालनाचा रखरखाव, सादरीकरण व माहिती देण्याचे कौशल्य या बाबींचा विचार करून मुल्यांकन केले. कार्यक्रमात रानभाज्यांची ओळख, महत्व, आरोग्यास होणारे फायदे, उपयोग, गुणधर्म याची माहिती मिळण्याकरिता उपस्थितांना रानभाजी माहिती पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.

  कार्यक्रमाचे प्रास्तावीक कु. सोनाली सुतार, मंडळ कृषी अधिकारी, मुलचेरा यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. आकाश लवटे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी केले. सदर कार्यक्रमात १५ शेतकरी गट, महिला शेतकरी गट, उमेदचे महिला बचत गट, इ. गटामार्फत रानभाजी व रानभाज्यांचे पदार्थाचे प्रदर्शन व विक्री करीता उपलब्ध करुन देण्यात आले होते. सर्व उपस्थित गटांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवुन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता श्री. एस.आर. गरमळे कृषी पर्यवेक्षक, श्री. प्रदीप मुंडे कृ.स., श्री. रोहित कोडापे कृ.स, श्री. के.के. वाघमारे कृ.स. , श्री. तिरुपती कौशल्य कृ.स. , श्री. शंकर कुमरे कृ.स. , श्री. रवी मडावी कृ.स., श्री. श्याम जाधव कृ. स. यांनी सहकार्य केले.