ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुलचेरात चतुर्थ श्रेणीसाठी कोतवालांची राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक

सरकारचा दुटप्पीपणा आझाद मैदानावर करणार आंदोलन

मुलचेरा: राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा आणि इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी कोतवालांनी आक्रमक भूमिका घेतली असून मंगळवार, दि. २४ रोजी राज्यभरात जिल्हास्तरावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. २५ तारखेपासून राज्यभर काम बंद आंदोलन सुरू करण्यात येणार असून सकारात्मक निर्णय न झाल्यास गुरुवार, दि. २६ पासून मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. मुलचेरा तालुक्यातील सर्व कोतवाल आंदोलनात सहभागी होणार असल्याचे संघटनेच्या वतीने सोमवारी 24/09/2024 रोजी मुलचेराचे तहसिलदार चेतन पाटील यांना निवेदन देण्यात आले.

कोतवाल कर्मचाऱ्यांच्या मागण्या

कोतवालांना चतुर्थी श्रेणी कर्मचारी दर्जा मीळावा, कोतवाल पदनाम बदलून महसूल सेवक नामांकन व्हावे, अनुकंपाबाबत विचारविनिमय व्हावा, कोतवाल मधून महसूल सहाय्यक, तलाठी पदोन्नती मिळावी, या मागण्या करण्यात आल्या आहेत.

कोतवाल संघटनेच्या माहितीनुसार राज्य शासनाकडून या मागण्यावर कोणतीही प्रभावी कारवाई वा सकारात्मक निर्णय अद्याप पर्यंत झालेले नाहीत. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला असून राज्यातील हजारो कोतवाल बांधव आंदोलनात सहभागी होणार आहेत. आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे.

याप्रसंगी संघटनचे अध्यक्ष मृन्मय मंडल, तालुका उपाध्यक्ष रमाबाई आत्राम, तालुका सचिव धम्मदीप खोब्रागडे, प्रतीम आदे, राजेश्वर बंडावार, प्राणतोष बिस्वास, विनोद गोटा, मंतोष बिस्वास, दौलत तोरे, अर्जुन कांदो, विनोद नैताम , रमेश मुत्येलवार, रमेश आत्रम , भगवान मडावी, रुशी उरेते, तारा रॉय, प्रितम सिडाम, अर्चना वेलादी, सुमित्रा सेडमाके, काजल मेश्राम, कमलाबाई सेडमाके, पालीबाई मट्टामी आदी उपस्थित होते.