ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

लाडकी बहिण योजना 2100 रुपये मिळणार पण सगळ्यांच का? योजनेच्या अटीमध्ये होऊ शकतो बदल

लाडकी बहिण योजना 2100 रुपये मिळणार पहा सविस्तर माहिती.

 

ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत १५०० रुपयांचा हफ्ता मिळत होता त्यांना आता यापुढे २१०० रुपये मिळू शकतो.

 

खरोखर हा हफ्ता मिळेल का किंवा या योजनेच्या पात्रतेच्या नियमांमध्ये काही बदल होऊ शकतो का काय शक्यता आहे. या विषयी आपण लेखामध्ये माहिती जाणून घेणार आहोत.

 

सगळ्यात आधी हि योजना मुख्यमंत्री लाडली बहना योजना अशा नावाने मध्यप्रदेशमध्ये सुरु करण्यात आली होती.

 

28 जानेवारी 2023 रोजी संपूर्ण मध्यप्रदेशमध्ये हि योजना लागू करण्यात आली होती. या योजनेला तुफान प्रतिसाद मिळाल्याने महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु करण्यात आली आणि पाहता पाहता हि योजना महाराष्ट्रात देखील तुफान लोकप्रिय झाली.

पावसाळी अधिवेशनामध्ये करण्यात आली होती योजनेची घोषणा

तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२४ च्या जुलै महिन्यामध्ये पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली होती.

 

निवडणूक आचारसाहिंता लागेपर्यंत १५०० रुपयांचे ५ हफ्ते म्हणजेच ७५०० रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा देखील केले होते. अर्थात महिलांचा सरकारला मत पत्रिकेतून पाठींबा मिळावा हा यामागील हेतू होता आणि तो मिळाला देखील.

 

विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा खूप मोठा प्रभाव दिसून आला.

१५०० एवजी मिळणार आता २१०० रुपये प्रती महिना

महाविकास आघाडीतील काही नेते निवडणुकीपूर्वी या योजनेला विरोध करत होते मात्र लोकसेवेची पंचसूत्री या जाहीरनाम्यामध्ये महिलांना महालक्ष्मी योजनेतून प्रती महिना ३ हजार रुपये देण्याची घोषणा देखील करण्यात आली होती.

अर्थात महायुतीने देखील लाडकी बहिण योजनेचे १५०० रुपये वाढवून मग २१०० देवू अशी घोषणा केली. आता मात्र महायुतीचे सरकार येणार हे निश्चित असल्याने राज्यावर याचा खूप मोठा बोजा पडणार असून सरकार हि योजना किती दिवस चालू ठेवते हे बघावे लागणार आहे.

यापुढे महिलांना २१०० रुपये मिळणार असल्याची घोषणा महायुतीने केलेली आहे आणि याची पूर्तता कशी केली जाते याकडे सगळ्यांची नजर असणार आहे. कारण या योजनेमुळे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवर मोठा परिणाम होणार आहे

लाडकी बहिण योजनेसाठी अनेक अटी लागण्याची शक्यता

महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु झाली त्यावेळी योजनेमध्ये अनेक बदल करण्यात आले होते. बऱ्याच जाचक अटी रद्द करण्यात आल्या होत्या जेणे करून जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळेल.

आता मात्र या योजनेच्या पात्रतेसाठी पुन्हा एकदा चाळणी लागू शकते कारण २१०० प्रती महिना महिलांना देवू हा शब्द तर मागे घेता येणार नाही परंतु योजनेच्या अंमलबजावणीसाठी जाचक अटी लावून लाभार्थी संख्या कमी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोणाला मिळणार लाभ

बऱ्याच महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाला असला तरी देखील अजून बऱ्याच महिला अशा आहेत कि त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही.

तुम्हाला जर नवीन नोंदणी करायची असेल आणि जर नियमात बदल केला नाही तर सध्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी जी कागदपत्रे लागतात ती अशी आहेत.

ज्या महिलांचे वय २१ ते ६५ वर्षे आहे अशा महिलांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पद्धतीने बँक खात्यामध्ये पैसे पाठविले जातात.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

आधार कार्ड.

अधिवास प्रमाणपत्र. जर अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर १५ वर्षापूर्वीचे मतदान कार्ड, राशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच टीसी. यापैकी कोणतेही एक.

वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. लाभार्थी महिलेकडे पिवळे अथवा केशरी राशन कार्ड असेल तर उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची काही गरज नाही. पांढरे राशन कार्ड असेल तर मात्र तुम्हाला उत्पन्नाचे प्रमाणपत्र जोडावे लागेल.

बँक खात्याला आधार नंबर लिंक असणे गरजेचे.

लाभार्थी महिलेचे हमीपत्र.

महिलेचा फोटो.

इत्यादी कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यसाठी आवश्यक असतात.

तर अशा प्रकारची हि एक शक्यता आहे कारण लाडकी बहिण योजना जरी लोकप्रिय असली तरी इतर शेतकरी योजनासाठी देखील शासनाला निधी उपलब्ध करून द्यावा लागणार आहे हे विसरून चालणार नाही. लाडकी बहिण योजना 2100