ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

UPI पेमेंट करताय? QR कोड स्कॅन करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होऊ शकतं बँक अकाउंट रिकामं

आजकाल सर्वकाही डिजिटल झाले आहे. अनेकजण ऑनलाइन पेमेंट करतात. UPI पेमेंटमुळे एका मिनिटांत पैसे ट्रान्सफर केले जातात. त्यामुळे अनेकजण रोख रक्कम ठेवत नाही.भाजीपाला घेण्यापासून ते अगदी हॉटेलमध्ये बिल देताना यूपीआय पेमेंटचा वापर केला जातो. यूपीआय पेमेंट जेवढे सोपे आहे तेवढेच ते जोखमीचेदेखील आहे.

यूपीआयचा क्यूआर कोड वापरताना नेहमी काळजी घ्यायची असते.क्यू-आर कोड स्कॅन करताना अनेकदा स्कॅम होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते.

QR कोडमुळे होऊ शकतात स्कॅम

अनेकदा आपण घाईगडबडीत क्यू आर कोड स्कॅन करतो. परंतु अनेकदा काही स्कॅमर्स याकडे लक्ष देऊन असतात. अनेकदा खोटा क्यूआर कोड स्कॅन करतात. परंतु हा क्यूआर कोड नसतो तर मालवेअर फाइल डाउनलोड करण्यासाठी क्यूआर कोड असतो.

एकदा तुम्ही लिंकवर क्लिक केले तर तुमच्या फोनमध्ये काही प्रोग्राम इ्नस्टॉल होतात. त्यामुळे तुमची सर्व माहिती हॅकर्सपर्यंत पोहचते. यात तुमच्या बँक अकाउंटची माहितीदेखील लिक होऊ शकते. यामुळे नेहमी क्यूआर कोड स्कॅन करताना काळजी घ्यायची असते. जर तुम्ही चुकीचे क्यूआर कोड स्कॅन केले तर तुमचे बँक अकाउंट खाली होऊ शकते.काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीसोबत असा स्कॅम झाला होता.

सावधगिरी बाळगा

QR कोड स्कॅम करण्याआठी रिसीवरचे नाव आणि इतर माहिती पाहा. त्यानंतरच क्यू आर कोड स्कॅन करुन पेमेंट करा.

कोणतेही डिजिट ट्रान्झॅक्शन करताना घाई करु नका. प्रत्येक लिंक किंवा प्लॅटफॉर्मसा वेरिफाय करा. त्यानंतरच पेमेंट करा.

डिजिटल ट्रान्झॅक्शन करताना नेहमी अधिकृत अॅपचा वापर करा. गुगल प्ले किंवा अॅपल प्ले स्टोअरमधील अॅप डाउनलोड करा.