लचेरा: आधार सेवा केंद्राला भेट देऊन पालक पाल्यांचे आधार कार्ड अपडेट करू शकतात. इतरांचे दहा वर्षांनंतर आधार कार्ड अपडेट करावे. बालकांचे आधार कार्ड अपडेट करून घेणे आता अत्यंत आवश्यक आहे. बालकांच्या बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या बाहुल्यांमध्ये पाच वर्षात बहुतांशी बदल होत असतो. त्यामुळे कालांतराने आधार कार्ड निष्क्रिय ठरू शकते. ही बाब लक्षात घेऊन बालकांचे आधार कार्ड पाच वर्षांनंतर अपडेट करून घेणे गरजेचे आहे.
यूआयडीएआयच्या मते जेव्हा मूल पाच वर्षांचे असेल तेव्हा त्यांचे बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे मूल पंधरा वर्षांचे असताना देखील बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे आवश्यक आहे.
कागदपत्रे काय लागतात पाल्यांचे जन्म प्रमाणपत्र, पालकांचे आधार कार्ड किवा रहिवासी पुरावा लागतो. मोठ्यांचा पहिल्यांदाच आधार कार्ड बनवायचे असेल तर शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र (टीसी) आवश्यक आहे.
मोठे करणार अपडेट
बालकांना सोडून मोठ्यांनाही आधार कार्ड अपडेट करणे बंधनकारक आहे. तसेच बालकांचे आधार अपडेट झाले नाही तर विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शासकीय अनुदानापासून त्यांना वंचित राहावे लागेल.
मोठ्यांचे आधार कार्ड दहा वर्षांनंतर करा अपडेट
तसेच मोठ्यांचे आधार कार्ड काढून दहा वर्षाचा अवधी लोटला असेल तर आधार कार्डे अपडेट करून घेणे आवश्यक आहे. ही बाब आता आवश्यक करण्यात आली आहे.