विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 मतदान जनजागृती कार्यक्रम अंतर्गत आरोग्य विभाग गडचिरोली यांच्या वतीने श्री संजय दैने जिल्हाधिकारी गडचिरोली व आयुषी सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती रॅली चे आयोजन दिनांक 13/11/2024 ला इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे करण्यात आले .त्यानंतर महिला व बाल रुग्णालय येथे मतदान प्रतिज्ञा घेण्यात आली.
मतदान करणे हा सर्वांचा मुलभुत हक्क असुन सर्वांनी मतदानाचा हक्क बजावण्यात यावा तसेच इतरांना सुध्दा मतदान करण्याकरीता प्रवृत्त करावे असे प्रतिपादन डॉ प्रताप शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले.रॅली चे उदघाटन डॉ प्रताप शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी,डॉ अविनाश टेकाडे अधिष्ठता शासकिय वैद्यकिय महाविद्यालय गडचिरोली, डॉ माधुरी किलनाके जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय गडचिरोली व सहायक आयुक्त समाज कल्याण डॉ सचिन मडावी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन करण्यात आले. या रॅली मध्ये आरोग्य विभागातील सर्व जिल्हास्तरीय अधिकारी व कमर्चारी उपस्थित होते तसेच गडचिरोली क्षेत्रातील सर्व आशा स्वयंसेविका , शासकिय नर्सिंग स्कुल गडचिरोली व श्री साई इंस्टीटयुट ऑफ नर्सिंग अँड मेडिकल सायन्स वाकडी येथील नर्सिंग विद्यार्थ्यांनी उपस्थित राहुन उर्स्फुत प्रतिसाद दिला. तसेच मतदान जनजागृती करीता हस्ताक्षर अभियान जिल्हा परिषद येथे राबविण्यात आले .
