मुलचेरा:- परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अवमानकारक शब्द वापरल्या प्रकरणी मुलचेरा येथे आज प्रबुद्ध बौद्ध समाज तर्फे निषेध मोर्चा काढून मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले. मुलचेरा येथील बुद्ध विहारापासून निषेध मोर्चा काढण्यात आला.मोर्चाचे नेतृत्व दुष्यंत चांदेकर यांनी केले .पोलिसांनी मोर्चा तहसील कार्यालयाच्या प्रवेश द्वारा जवळ थांबवून नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले . निवेदनात म्हटले आहॆ ,10 डिसेंबर रोजी परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणारा सोपान पवार याच्यावर देशद्रोहा चा गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा ठोठवावी.या प्रकरणी पोलीस कोठडीत मृत्यू पावलेला सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची शासनाने आर्थिक मदत करुन कुटुंबातील एकाला शासकीय सेवेत घेऊन कुटुंबाचे पुनर्वसन करावे.पोलिसांच्या कोबिंग ऑपरेशनची न्यायालयीन चौकशी करावी.पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड सह ईतर दोषी अधिकाऱ्यांवर अँट्रोसिटी actअंतर्गत गुन्हे दाखल करावे.परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशन चे सीसीटीव्ही फुटेज तपासावे.आदी मागण्या करण्यात आल्या.निषेध मोर्चा च्या आयोजन समितीचे अध्यक्ष शुभम शेंडे,उपाध्यक्ष विनोद झाडे,प्रफुल दुर्गे,सूर्यप्रकाश चांदेकर,सचिव कालिदास दुर्गे,कोषाध्यक्ष लवकुमार दुर्गे,सहसचिव रवींद्र झाडे,मीडिया प्रमुख रोहित करमे,येल्ला चे उपसरपंच दिवाकर उराडे,कवडूजी चल्लेवार ,कालिदास कुसनाके,आंबटपल्लीचे सरपंच उमेश कळते,सेवानिवृत्त मुख्याध्यापक शेंडे,सत्यवान भडके यांच्या सह तालुक्यातील बहुसंख्य बांधव उपस्थित होते.यावेळी मोर्चा स्थळी माजी जि प अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भेट दिली.
Related Articles
UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2024
UPSC, Combined Geo-Scientist (Preliminary) Examination 2024, UPSC CGS Recruitment 2023 (UPSC CGS Bharti 2023) for 56 Posts. (UPSC GEOL 2024). इतर UPSC भरती UPSC प्रवेशपत्र UPSC निकाल जाहिरात क्र.: 02/2024 GEOL परीक्षेचे नाव: संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2024 Total: 56 जागा पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 जियोलॉजिस्ट,ग्रुप ‘A’ 34 2 जियोफिजिसिस्ट, ग्रुप ‘A’ 01 3 […]
रांगी परिसरात परतीच्या पावसाने हलक्या धानाची नासाडी
धानोरा:-तालुक्यातिल रांगी परिसरातील शेतकर्याना सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने धानाची लागवड करताना मोठ्या प्रमाणात हलक्या धानाची पेरणी केलेली आहे. सध्या हलके धान पिक कापणीला आले. मात्र दररोज पडणाऱ्या पावसामुळे धान कापणी होवू शकत नाही.उभ्या धानपिकाला पावसाने झोडपल्याने अनेक शेतकऱ्यांचे हलके धान झोपले.दररोजच्या पावसाने बांधितिल पाणि बाहेर काढणे शक्य नसल्याने मोठ्या प्रमाणात धान्याची नासाडी होत आहे. त्यामुळे […]
मुलचेरा येथे मुद्रांक विक्रेता नाही ,स्टॅम्प पेपर साठी नागरिकांना अहेरी ला माराव्या लागतात फेऱ्या
मुलचेरा::-तब्बल तीन वर्षापासून मुलचेरा येथे मुद्रांक विक्रेता नसल्याने तालुक्यातील नागरिकांना स्टॅम्प पेपर साठी अहेरी किंवा चामोर्शी येथे चकरा माराव्या लागले परिणामी आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. नवीन शैक्षणिक वर्ष नुकतेच सुरू झाले असून शासकीय कार्यालयांशी निगडित प्रतिज्ञापत्रे, संमतीपत्र आदी शासकीय कामकाजांसाठी कोर्ट फी, स्टॅम्प पेपरची नागरिकांसह विद्यार्थांना आवश्यकता असते. परंतु मुद्रांक […]