राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन सन्मान योजनेअंतर्गत
जेष्ठ कलावंतांचे आधार पडताळणी करण्याचे आवाहन
गडचिरोली,(जिमाका),दि.29: राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यक व कलावंत सन्मान योजनेअंतर्गत गडचिरोली जिह्यातील 540 लाभार्थीपैकी दिनांक 27.11.2024 पर्यंत 427 लाभार्थींचे ऑनलाइन आधार व्हेरिफिकेशन झालेले असून 113 लाभार्थींचे आधार व्हेरिफिकेशन प्रलंबित आहे. तेव्हा प्रलंबित लाभार्थीचे आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी शासनाने 10 डिसेंबर 2024 ही अंतिम मुदत दिलेली असुन सदर लाभार्थीनी आधार व्हेरिफिकेशन विहीत मुदतीत करण्याची कार्यवाही आपल्या तालुक्यातील गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचे कडून पुर्ण करावी. असे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.