ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राजे धर्मराव महाविद्यालयात राजे सत्यवानराव महाराजांची जयंती संपन्न

स्थानिक राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालय येथे राजे सत्यवानराव महाराज आत्राम यांची जयंती साजरी करण्यात आली.

सत्यवानराव महाराज यांचे गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक आणि शैक्षणिक कार्य अनेकांना प्रेरणा देणारे आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे कार्य समजावे यासाठी महाविद्यालयात दरवर्षी त्यांची जयंती साजरी केली जाते.

या प्रसंगी संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी प्राचार्य डॉ. अजय मुरकूटे हे होते. कार्यक्रमाला प्रा. डॉ. हेमंत गजाडीवार, प्रा. डॉ. अशोक धोटे, प्रा. डॉ. अरुण लाडे, कविता ऊईके, सुरेश मुरमुरवार, किशोर साईनवार यांची उपस्थिती होती.