गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी वसतीगृह प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा कु. भारती वरुडकर, गृहपाल आदिवासी मुलींचे वसतिगृह मुलचेरा

मुलचेरा: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी अंतर्गत अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता 1मुलांचे व 1 मुलींचे असे एकुण 2 शासकीय वसतीगृह कार्यरत आहेत. त्यातील सन 2024-25 करीता रीक्त जागांवर प्रवेश घेण्याकरीता www.swayam.mahaonline.gov.in या प्रणालीमध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा. मुलचेरा वसतीगृहात इयत्ता 8 वी ते पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.
वरील संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अर्ज भरतांना सदर प्रणालीमध्ये दिलेल्या सुचनांचे काळजीपुर्वक वाचन करावे तसेच सदरील सुचनेनुसार कागदपत्रांची जोडणी करण्यात यावी.वसतीगृहातील जुने प्रवेशित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेऊन अर्ज रिन्यूव हे ऑप्शन निवडुन भरावे. असे न केल्यास सदर विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे असे समजुन त्याचेजागी नविन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. अर्ज भरल्यानंतर ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढुन कागदपत्रांसह हार्ड कॉपी संबंधीत वसतीगृहात एक आठवड्याच्या आत सादर करावी. वसतीगृह प्रवेशाचे संकेतस्थळ पदवी, अभ्यासक्रमाकरीता दिनांक 31 जुलै 2024 पर्यत त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावे. असे कु. भारती वरुडकर, गृहपाल आदिवासी मुलींचे वसतिगृह यांनी कळविले आहे.