ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी शेतात जाऊन धान पिकाची पट्टा पद्धतीने केली रोवणी

मुलचेरा: 

चक्क गोमनी येथील माधव वारलू दिवटीवार यांच्या धानाच्या शेतात तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी हजेरी लावली.यावेळी त्यांच्या हस्ते ‘ पट्टा’ पद्धतीने धान पिकाची लागवड करण्यात आली. धान पिकाची पट्टा पद्धतीने लागवड केल्याने फायदे होतात याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी भात लागवडीने वेग धरला आहे. कृषी अधिकारी स्वतः शेतकरी, लागवड करणाऱ्या महिलांसोबत संवाद साधत भात रोवणी केली. कृषी अधिकारी यांनी तण व्यवस्थापन, माती परीक्षणानुसार सुयोग्य खताचा वापर करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच सुधारित पद्धतीने भात लागवड करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले.

याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी कु. सोनाली सुतार मॅडम,कृषी पर्यवेक्षक एम.के. दूधबावरे सर,कृषी सहाय्यक टी.ए.कौशल्ये,व शेतकरी माधव दिवटीवार,व इतर शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.