दुचाकी धारकाने एस टी वाहकाचे डोके फोडून केले रक्तबंबाळ*
शुल्लक कारण
एक तास होती एस टी सेवा बंद
आलापल्ली:-
अहेरी एस टी आगाराच्या वाहकाचे शुल्लक कारणावरून एका दुचाकी धारकाने डोके फोडून जखमी केल्याची घटना आज दुपारी पावणे चार वाजता मुलेचरा तालुक्यातील सुंदरनगर जवळ घडली.
अहेरी आगाराची बस क्रमांक एम एच १४ एल एक्स ५१७७ ही गडचिरोली वरुण मुलचेरा मार्गे अहेरी कडे येत होती.सदर बस सुंदर नगर जवळ आली असता अरुंद रस्त्यामुळे बस चे चाक रस्त्याच्या लगत असलेल्या खड्ड्यात फसली त्यामुळे बस चालक सेवाधारी तराळे यांनी बस उभी केली याच वेळी समोरून दुचाकी धारक व्यंकटेश गाजर्लावार रा.कोपरअली येत होता त्यावेळी बस रस्त्यावर उभी का केली मी कसा जाऊ म्हणून त्याने त्याचे वाहन रस्त्यावर उभे करून माझी दुचाकी कशी काढू असे म्हणत शिवीगाळ करणे सुरू केले त्यावेळी वाहक सुहास हंबर्डे यांनी बाजूला जागा आहे दुचाकी निघू शकते एवढे बोलताच काहीच न ऐकता व्यंकटेश गाजर्लावार याने दुचाकी च्या चावीने वाहक सुहास हंबर्डे यांच्या डोक्याला मारहाण केली त्यामुळे वाहकाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव सुरू झाला.वाहक सुहास हंबर्डे यांनी अहेरी एस टी आगार व पोलिस स्टेग्सन मुलचेरा यांना भ्रमणध्वनी ने यांना माहिती दिली काही वेळातच मुलचेरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि वाहक सुहास हंबर्डे यांना मुलचेरा येथे दवाखान्यात भरती केले व मारहाण करणाऱ्या व्यंकटेश गाजर्लावार यास अटक केली असून त्यावर पोलिस स्टेशन मुलचेरा येथे गुन्हा नोंद झाला आहे.पुढील तपास मुलचेरा पोलिस करत आहे.
सदर घटनेची माहिती अहेरी येथील राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी सर्व एस टी बस उभ्या केल्या आणि जो पर्यंत मारहाण करणाऱ्या अटक होत नाही तोपर्यंत बस चालणार नाही असा पवित्रा घेतला. मुलचेरा पोलिसांनी काही वेळातच आरोपीस अटक केल्यानंतर एस टी फेऱ्या सुरू झाल्या.
अरुंद आणि खड्डेमय रस्त्यामुळे अनेक वेळा एस टी बस रस्त्यात फसत असतात मात्र याचा फटका प्रवाश्यांना आणि वाहक व चालकास बसत असतो.