मुलचेरा-: बऱ्याचदा महसूल विषयक कामकाजाविषयी माहिती नसल्यामुळे शेतजमिनविषयक कामकाजत नागरिकांना नाहक त्रास उद्भवत असतो. परिणामी जमीन खरेदी विक्री प्रकरण असो किंवा जमिनीबाबत इतर विषय असोत,नागरिकांना असलेल्या माहितीच्या अभावी बरेचशे प्रकरणे न्यायालयापर्यंत जात असतात. नागरिकांना महसूली व्यवहाराची अगदी सोप्या भाषेत माहिती व्हावी या हेतूने माजी सेवानिवृत्त सनदी अधिकारी शेखर गायकवाड (भा.प्र.से) यांच्या संकलपनेतून साकर झालेले, संजय दैने जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनातून व मुलचेऱ्याचे तहसीलदार चेतन पाटील यांच्या प्रत्यक्ष कृतीतून निर्माण झालेले गोष्टीरूप महसूल वाचनालयाचे उदघाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते झाले.स्थानिक तहसील कार्यालयात दिनांक 3 आगस्ट ला मुलचेरा तालुक्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्याकरिता आले असता त्यांनी सदर गोष्टीरूप महसूल वाचनालयाचे उदघाटन केले. सदर गोष्टीरूप महसूल वाचनालयात शेतजमीन विक्री प्रकरण, आदिवासी शेतजमीन हक्क हस्तांतरण, शेतजमिन विभाजन अश्या एकूण 36 प्रकारच्या जमीन व्यवहाराशी निगडित गोष्टीबाबत चित्राच्या माध्यमातून तसेच मार्मिक गोष्टीच्या माध्यमातून त्यांची माहिती विषद केले आहे. सदर गोष्टीरूप महसूल वाचनालय हे जिल्ह्यातील एकमेव वाचनालय असल्याने मुलचेऱ्याचे तहसीलदार चेतन पाटील यांच्या सदर उप्रकमाचे मंत्रिमहोदयानी कोतुक केले.
Related Articles
मुलचेरा तालुक्यातील कोपरली येथे ‘हात से हात जोडो’ अभियानाची बैठक संपन्न
काँग्रेसची विचारधारा शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा-जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचे आवाहन मुलचेरा- काँग्रेस पक्षाची विचारधारा ही सर्व सामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना विकासाचा केंद्र बिंदू मानत वाटचालीची व समाजात सद्भावना कायम ठेवण्याची आहे. मात्र सध्याचे सत्ताधारी जाती-धर्मात तेड निर्माण करीत सत्ता उपभोगत आहेत. सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्याची बेरोजगारांची समस्या मार्गी लागण्यासाठी काँग्रेसची विचारधारा जिवंत असणे गरजेचे आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही […]
पीक विमा योजनेचा लाभ घ्या तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांचे आवाहन : ३१ जुलैपर्यंत मुदत
मुलचेरा: प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ ते रब्बी २०२६ हंगामासाठी ३ वर्षासाठी अधिसूचितक्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. खरीप हंगाम २०२३ मध्ये सदर योजनेतील सहभाग हा कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असून योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत खरीप हंगाम ३१ जुलै, २०२३ अशी आहे. त्यासाठी पीएमएफबीवाय हे […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शेतकऱ्यांशी संवाद; आधुनिक शेतीबरोबरच पीक पद्धतीत बदल करण्याचे आवाहन
मुंबई दि २७ :- “राज्यात पावसाला चांगली सुरूवात झाली आहे… पेरणी झाली का.. नागली घेता का? भात लावणीसाठी यंत्राची मदत घ्या, कमी वेळेत जास्त काम होईल, शिवाय मनुष्यबळही कमी लागेल…नागली, वरईसह आणि वेगवेगळ्या पिकांची लागवड करा, यातून उत्पन्न वाढण्यास मदत होईल” असे सांगतानाच राज्य शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिली. […]