ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुलचेरा तालुक्यात सेवा पंधरवडा निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

मुलचेरा

तहसील कार्यालय मुलचेरा मार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता मा पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा राबविण्याचे आयोजित आहे . यामधे मुख्य तीन टप्पे असणार आहेत. पहिल्या टप्प्यांमध्ये दिनांक १७ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये पाणंद रस्ते विषयक मोहीम राबविण्यात येणार आहे . त्यांतर्गत संपूर्ण ६९ गावांमध्ये शिवार फेरी करण्यात आलेली असून यामध्ये रस्त्यांची वर्गीकरण आणि रस्त्यांची माहिती याचा डाटा संकलित करण्यात येणार आहे . या अभियान कालावधीमध्ये लगाम महसूल मंडळामधून दामपुर आणि मुलचेरा महसूल मंडळामधून उदयनगर ही गावे निवडलेले आहेत. ह्या गावामध्ये रस्त्यांची शिवार फेरी,रस्त्यांचे सीमांकन करण्यात येईल तसेच अतिक्रमण झालेले असल्यास ते निष्कासित करण्यात येईल आणि त्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.

 दुसरा टप्पा दिनांक २३ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२५ या कालावधी मध्ये असणार आहे. यामध्ये सन २०११ पूर्वी शासकीय जमिनीवर घरांसाठी अतिक्रमण आहेत असे प्रस्ताव तयार करून शक्ती प्रदत्त समितीमार्फत त्यांना स्थायी पट्टे देण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

 तिसरा टप्प्यामध्ये दिनांक २८ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर, नावीन्यपूर्ण योजना राबविण्याचे नियोजीत आहे. यामध्ये लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत ज्या सातबारा वरती पुरुषांचं नाव आहे अशा ठिकाणी त्यानी संमती दिल्यानंतर त्यांच्या पत्नीचे नाव सहहिस्सेदार म्हणून लावण्याचा उपक्रम आहे . आज अखेर आपल्याकडे एकूण असे ५२ प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. दुसरी महत्वाची योजना सामायिक क्षेत्रातील खातेदारांसाठी आहे. यामध्ये आपण आपसी समंतीने वाटप करून पोटहिस्सा पाडणे अंतर्भूत आहे . असे एकूण ४१ प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.तसेच तालुक्यातील आदिम जमाती साठी वेंगणूर या ठिकाणी ३० सप्टेंबरला आणि भटक्या विमुक्त जातीची लोकसंख्या असलेले लाभानतांडा या गावी ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी आपण शिबीर आयोजित केलेले आहे. विध्यार्थ्यांसाठी कमवा आणि शिका योजने अंतर्गत आपण आपले सरकार केंद्र स्थापन करणार आहोत जेणेकरून विध्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक दाखले त्याच महाविद्यालयात दिले जातील. तहसील कार्यालय मुलचेरा QR कोड वाचनालय हा एक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवत आहे,यामध्ये तब्बल कायद्याची ११ पुस्तके अतिशय सोप्या पद्धतीने आणि मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. अशा प्रकारे एकूण १५ दिवसांचा अतिशय सुनियोजित कार्यक्रम आपण सुनिश्चित केलेला आहे आणि त्यानुषंगाने उद्यापासून कार्यवाही सुरु होणार आहे.