ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

बालदिनाला पथनाट्यातून मतदान व बाल हक्क बाबत जनजागृती

गडचिरोली,(जिमाका),दि.16: 14 नोव्हेंबर बाल दिन निमित्त महिला व बाल विकास विभाग, गडचिरोली व फुले आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, गडचिरोली यांच्यावतीने दिनांक 14 नोव्हेंबर 2024 ला गांधी चौक व बस स्थानक परिसरात मतदान व बाल हक्क जनजागृती या विषयावर पथनाट्य आयोजन करण्यात आले होते. पथनाट्याच्या माध्यमातून बालकांचे हक्क आणि मतदान प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी मतदान करण्याचा संदेश देण्यात आला. 

            स्वीप समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने, व स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनात व नियंत्रणात, यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी बाल कल्याण अर्चना इंगोले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर, बाल विकास नागरी प्रकल्प अधिकारी ज्योती कडू, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. 

यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरणुले, फुले आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय प्राध्यापिका डॉ. कविता उईके, बाल संरक्षण अधिकारी कवेश्वर लेनगुरे, बाल संरक्षण अधिकारी प्रियंका आसुटकर, सामाजिक कार्यकर्ते जयंत जथाडे, क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार, चाईल्ड हेल्पलाईन समन्वयक देवेंद्र मेश्राम, पियूष सहारे, तसेच इतर कर्मचारी व बाल विकास नागरी प्रकल्प कार्यालय अंगणवाडी सेविका उपस्थित होते.

           सदर कलापथक सादर कर्ते बि.एस.डब्लू. भाग-३ मधील विद्यार्थी आदित्या भोपये, रोशन झोडे, रोहित मरस्कोल्हे, साहिल तलांडे, निवेदिता वंगणे, शेजल राऊत, सुप्रिया कंकलवार, दिक्षा अल्लूरी, लावण्या येलकुंचेवार, नीलिमा धोडरे, शांता बावणे यांचा सहभाग होता.