मुलचेरा:-
महसूल विभागात ४० टक्के पदे रिक्त असून, लोकसंख्येनुसार नवीन आकृतीबंध तयार करावा यासह इतर मागण्यांसाठी महसूल कर्मचार्यांनी आंदोलन सुरू केले आहे. सोमवार १५ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले असून, दुसर्या दिवशी म्हणजेच १६ जुलै रोजी देखील महसूल कर्मचार्यांचे काम बंद आंदोलन सुरू होते. या संपात मुलचेरा येथील तहसील कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे कामकाज प्रभावित झाले असून कामासाठी आलेल्यांना रिकाम्या हाती घरी परतावे लागले. महसूल कर्मचारी संघटनेने वेळोवेळी राज्य शासनाला निवेदने देऊन महसूल विभागातील रिक्त पदे भरावेत, लोकसंख्येनुसार नवीन आकृतीबंध तयार करावा, पदोन्नती, पदाचे नामांतरण, वैद्यकीय बिले अशा मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले होते. परंतु या मागण्यांची पूर्तता न झाल्याने आंदोलनास सुरूवात केली आहे.
१० जुलैला काळ्या किती लावून आंदोलन करण्यात आले. दुसर्या दिवशी निदर्शने करण्यात आले. तर शुक्रवारी लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी उत्पन्न व रहिवासी दाखले महसूल विभागाकडून दिले जात आहेत. त्यामुळे लाडकी बहिण ही अडचणीत आली आहे. महसूल विभागाचा सुधारीत आकृतीबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करावा, अव्वल कारकून, मंडल अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार या पदावर पद्दोन्नती द्यावी.
वैद्यकिय देयके २ ते ३ वर्षांपासून प्रलंबित आहेत. ते तात्काळ द्यावेत. महसूल सहायक व तलाठी यांचा ग्रेडपे वाढवावा. सेवा नियमित होण्यासाठी महसूल सहायक व तलाठी यांना विभागीय दुय्यम सेवा परीक्षा व पदोन्नतीसाठी महसूल अहर्ता परीक्षा अशा दोन परीक्षा देणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या इतर कोणत्याही विभागात दोन परीक्षा पद्धती नाही. काही विभागात तर परीक्षा पद्धतीच नाही. त्यामुळे महसूल विभागात देखील एकच परीक्षा पद्धत करण्यात यावी, यासह इतर मागण्या या संपाच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात आल्या आहे.
या प्रंसगी श्री.लोमेश उसेंडी नायब तहसिलदार, श्रीमती रेखा मने नायब तहसिलदार, श्री दिलीप कावटे नायब तहसिलदार,श्री जी एम भांडेकर अका, श्री बी.पी.जल्लेवार महसूल सहायक, श्री.सि.के.जोगदंड महसूल सहायक,श्री. एस एन हामंद महसूल सहायक, कुमारी ए एम सहारे अका, कुमारी सी एम. बोबाटे महसूल सहायक , के डब्लू गेडाम शिपाई, एम आर रामटेके शिपाई, जि.पी. तोरे शिपाई आदी महसुल कर्मचारी उपस्थित होते.