आपल्या देशामध्ये हजारो कोटी रुपयांची उलाढाल दर वर्षाला कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी होते. आता हीच कीटकनाशके ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लवकरच येणार आहेत. म्हणजेच जनसामान्य शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने कीटकनाशके आता खरेदी करता येणार आहेत.
Pesticides Home Delivery For Farmer
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने कीटकनाशके ऑनलाईन पद्धतीने विक्री करण्यासाठी नुकतीच त्या संदर्भातील नियम व अटीसह अधिकृत परवानगी दिलेली असून, या दिलेल्या परवानगीचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या घरापर्यंत कीटकनाशके उपलब्ध होतील.
केंद्र शासनामार्फत घेण्यात आलेला हा निर्णय खूपच महत्त्वाचा आणि डिजिटल इंडियाच्या धोरणाला लक्ष्यात घेता महत्त्वाकांक्षी मानला जात आहे. कारण शेतकऱ्यांना काही वेळेस नाइलाजत्सव अशी औषधे खरेदी करावी लागतात, जी हवी असतात परंतु दुकानांमध्ये उपलब्ध नसतात. त्यामुळे आता ई-कॉमर्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवे तेच कीटकनाशक मिळू शकेल.
15 ते 20 टक्क्यांनी फवारणी औषध कमी मिळणार
त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे मध्यस्तांची साखळी कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना जवळपास 15 ते 20 टक्क्यांनी कीटकनाशक स्वस्तामध्ये मिळणार आहेत; परिणामी शेतकरी योग्यरीत्या योग्य कीटकनाशकांची निवड करतील व भरघोस उत्पन्न घेण्यासाठी त्यांना नक्कीच मदत होणार आहे.
निर्णयामधील नियम व अटी
- ऑनलाइन विक्रीकरिता संबंधित ई-कॉमर्स कंपनीकडे कीटकनाशक विक्री करण्याचा परवाना असणे बंधनकारक असेल.
- ऑनलाइन विक्रीसाठीच्या लायसनचा नियमानुसार मुदतीत रिन्यूअल करणे आवश्यक असेल
- ऑनलाइन विक्री करताना विक्रेत्यांना ग्राहक संरक्षण कायदा 2200 पालन करावे लागेल
सध्यास्थितीमध्ये सुद्धा देशांमधील बऱ्याच ई-कॉमर्स आणि कीटकनाशक उत्पादन करणाऱ्या कंपन्याकडून ऑनलाईन पद्धतीने कीटकनाशकांची विक्री केली जाते; मात्र यामध्ये काही अडचणी असल्याकारणामुळे या व्यवस्थेबाबत उद्योगांमध्ये थोडासा समभ्रमण होता. याबाबत केंद्रशासनाने 24 नोव्हेंबर 2020 रोजी स्वातंत्र्य निर्णय घेतल्यामुळे या व्यवसायात स्पर्धा होऊन शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे.
केंद्रीय कृषी मंत्रालयाने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म बाबतच्या संपूर्ण अडचणी, तांत्रिक गोष्टी यांची वैयक्तिकरित्या पडताळणी केल्यानंतर कीटकनाशक पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही संपूर्ण प्रक्रिया करत असताना ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म धारकांना काही अटी व शर्ती ठरविण्यात आलेल्या आहेत. त्यानुसारच त्यांना परवानाधारक विक्रेत्यांकडून उत्पादन खरेदी करावे लागणार आहेत.
एकंदरीत शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय कृषिमंत्रालयामार्फत घेण्यात आलेला असून, यामुळे शेतकऱ्यांना पाहिजे असलेले औषधे ऑनलाईन मिळतील तेसुध्दा 15 ते 20 टक्के कमी दराने, सोबतच कीटकनाशके हवी तीच खरेदी करता येतील सोबतच या संपूर्ण प्रक्रिया दरम्यान (Pesticides Home Delivery) कीटकनाशके शेतकऱ्यांना घरपोच मिळतील.