दिनांक 28/09/2023 ला एकल अभियान अंचल आलापल्ली संच सुंदरनगर व गिताली या दोन संचाची संच स्तरीय खेल कूद समारोह संपन्न झाला .
एकल अभियान हे एक सामाजिक संघटन असून या अंतर्गत पाच तत्वावर सामाजिक कार्य केले जाते.शारीरिक शिक्षण विषया अंतर्गत मुलांची शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी एकल अभियान भव्य खेलकूद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या समारोहात संचातील आचार्य व मुले जास्तीत जास्त संख्येने सुंदरनगर येथे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्धघाटक विदर्भ भागचे कार्यकर्ते श्री.विकासजी राठोड भाग प्राथमिक शिक्षा प्रमुख,कू.रेनुकाताई कंचकटले भाग ग्रामस्वराज्य मंच प्रमुख ,देवणाथजी ग्रामप्रमुख सुंदरनगर,स्नेह संपर्क सदस्य कविता साना सुंदरनगर, अंचल अभियान प्रमुख नरेश गड्डमवार, ग्रामस्वराज मंच प्रमुख महेश बुरमवार, कार्यलय प्रमुख दिलीप सेडमेक उपस्थित होते .खेळात संच सुंदरनगर व संच गीताली येतील मुलांनी सहभाग घेतला होता. यात कब्बडी , रनिंग, उंच उडी,लांब उडी या खेळाचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संच प्रमुख मनोज कलसार व प्रास्ताविक महेश बुरमवार यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संच समिती,ग्राम समिती,आचार्य यांनी मोलाचं सहकार्य लाभलं.
