ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांच्या वापराने जनसंपर्क क्षेत्रातील कामे प्रभावीपणे करावीत- प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह

आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात कृत्रिम बुद्धिमत्ता हे व्यवस्थापन व संवाद क्षेत्रात एक प्रभावी साधन ठरत आहे. जनसंपर्क क्षेत्र हे विश्वासावर चालते. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि चॅटजीपीटी (ChatGPT) आदीसारख्या तंत्रज्ञानांनी मोठा बदल घडवून आणला आहे. एआयचॅटजीपीटीकॅनव्हा आदी सगळी साधने आहेतयाचा वापर योग्यरित्या करायला शिका. या साधनांचा उपयोग करून जनसंपर्क क्षेत्रातील कामे अधिक चांगली आणि प्रभावीपणे करावीतअसे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.

राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियामुंबई विभागाच्यावतीने प्रेस क्लब ऑफ इंडियामुंबई येथे आयोजित “कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदार वापर : जनसंपर्काची भूमिका” या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी अतिथी वक्ते द इकॉनॉमिक टाईम्सचे कार्यकारी संपादक मुकबिल अहमरइंडियन ऑइलच्या मुख्य महाव्यवस्थापक तथा पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियामुंबई विभागाच्या अध्यक्ष अनीता श्रीवास्तवकॉर्पोरेट अफेअर्स इंड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स लिमिटेडचे संचालक तथा पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियामुंबई विभागाचे उपाध्यक्ष राजेश परिडासचिव डॉ. मिलिंद आवताडेखजिनदार अमलान मस्कारेनहासमुंबई विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाच्या प्राध्यापिका दैवता पाटीलजनसंपर्क आणि पत्रकारिता क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच मुंबई विद्यापीठातील मास कम्युनिकेशन आणि पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते.

प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह म्हणालेजरी ‘एआय’ला मानवी भावना समजत नसल्या तरीहीभावना विश्लेषण आणि प्रतिक्रिया संकलनात त्याची कार्यक्षमता खूप आहे. तंत्रज्ञान सतत बदलतंय. जो नवीन गोष्टी शिकत राहतोतोच टिकतो. त्यामुळे आज ‘एआय’ आहेउद्या दुसरं काही येईलपण तुम्ही शिकण्याची आणि जुळवून घेण्याची वृत्ती ठेवलीतर तुम्ही कुठेही कमी पडणार नाही. ‘एआय’ आणि चॅटजीपीटी सारख्या तंत्रज्ञानांनी खरंच खूप मोठा बदल घडवून आणलाय. जिथे पूर्वी मानवी मेंदूची गरज असायचीआज तिथे मशीन हे काम करतंय आणि बऱ्याच वेळा ते अधिक जलदअधिक अचूक पद्धतीनं करतंय. पण यातून घाबरण्यापेक्षा शिकण्याची आणि स्वतःला नव्यानं सिद्ध करण्याची गरज आहे. कारण कोणतंही यंत्र मानवी कल्पकतेशीअनुभवाशी आणि सहानुभूतीशी स्पर्धा करू शकत नाही. भाषांतर करणेलेख लिहणेव्हीज्युअल तयार करणेअहवाल तयार करणे असो  किंवा कोणत्याही भाषेत सोशल मीडियासाठी पोस्ट्स बनवणे असो ‘एआय’ लगेच करू शकतं असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्ता एक वेगळेच पाऊल आहे. कारण पहिल्यांदाच एखाद्या तंत्रज्ञानाला निर्णय घेण्याची क्षमता आहे. संगणक टायपरायटरची जागा घेऊ शकतोपण तो मानवी आदेशावर चालतो. ‘एआय’ मात्र स्वतः शिकतो आणि निर्णय घेतो. जगातील ६० देशांनी राष्ट्रीय एआय धोरण तयार केले आहेअसे द इकॉनॉमिक टाईम्सचे कार्यकारी संपादक मुकबिल अहमर  यांनी सांगितले.

‘एआय’वर १४२ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहेपुढच्या काही वर्षांत ती २०० अब्ज डॉलरपर्यंत जाणार आहे. तसेच ५५ टक्के कंपन्यांकडे एआय बोर्ड आहेआणि ५४ टक्के कंपन्यांकडे मुख्य कृत्रिम बुद्धिमत्ता अधिकारी या पदावर काम करणारे अधिकरी आहेत. हा फक्त ट्रेंड नाहीहे तर क्रांती आहे. एआय सर्व क्षेत्रांत बदल घडवत असल्याचे श्री. अहमर यांनी यावेळी सांगतिले.