मुंबई, दि.14 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मंत्रालयात साजरी करण्यात आली. यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयाच्या प्रांगणात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.
