माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे कडून दुर्गम कुटूंबाला 10000/-(दहा हजार रुपये) आर्थिक मदत..!
सिरोच्या:-तालुक्यातील जाफराबाद ग्रामपंचायत येथील भाजपचे कार्यकर्ते मारुषी दुर्गम व महेश दुर्गम यांची आई महाकाली व्यंकट दुर्गम यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले ही माहिती माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना कळताच त्यांनी व्यंकट दुर्गम यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटूंबाचे सांत्वन केले.
तसेच पुढील होणाऱ्या तेरावी कार्यक्रमासाठी माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी 10000/-(दहा हजार रुपये) आर्थिक मदत केली.
यावेळी भाजपचे कार्यकर्ते सुधाकर पेद्दी, मधुकर नीलम,माजी सरपंच बापू सडमेक,संतोष पाडला, मारय्या नीलम,रंजबापू कशेट्टी,महाकाली कोटा, स्वप्नील पेद्दी,सतीश कट्टा,रघुपती आत्राम, राजाराम सोदारी तसेच भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते..!