ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

जिल्हा रक्तदाता शोधमोहीम व जनजागृती अभियान अंतर्गत आयोजित रक्तदान शिबिरात 16 रक्तदात्यांनी केले रक्तदान

चामोर्शी-
जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था येणापूर ता.चामोर्शी जि. गडचिरोली द्वारा संचलित जिल्हा रक्तदाता शोधमोहीम व जनजागृती अभियान अंतर्गत आपल्या गडचिरोली जिल्ह्यात रक्ताची टंचाई भासू नये व वेळेवर गरजू व्यक्तीला रक्त मिळवून देण्याकरिता, रक्तदाते शोधण्याच्या व जनजागृती करण्याच्या उद्देशाने दिनांक 4 ऑक्टोबर 2022 रोज मंगळवार ला रक्तदान शिबिराचे आयोजन युवा मंडळ मुधोली (तु) यांच्या विद्यमाने, ग्राम रक्तदुत रामकृष्ण दिवाकर झाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुधोली (तु) येथे आयोजित केले होते. सदर शिबिरामध्ये एकूण 16 रक्तदात्यानी रक्तदान केले. यामध्ये दिलीप वर्धलवार,पंकज येलमुले, कुंदन गौरकार,संतोष गेडाम,स्वप्निल बुटले, अनूप गोंगले, संदीप सुवटकर, राकेश देवतडे, अजय मेश्राम, किशोर राजकोंडवार, मधुकर झाड़े, किशोर नागापुरे, मिथुन मडावी, संदेश देवतड़े, भगीरथ दाकोते, उमाकांत बुदे यांनी सदर शिबिरात रक्तदान केले.
सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. कुंदन गावडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले, उद्घाटक साहेब याचे यांचे युवा मंडळ मुधोली (तु) वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख उपस्थिती ग्रामपंचायत सरपंच सौ. शकुंतला डाकोटे, उपसरपंच दिलीप दादा वधर्लवार, राकेश दंडीकवार ग्रा. प. सदस्य कोनसरी, गोपाळ जाधव पो.ना.बीट जमादार जयरामपूर , गायत्री लेडांगे समुदाय आरोग्य अधिकारी जैरामपूर, जिल्हा रक्तदुत रवींद्र बंडावार, कोड़ापे मॅडम ग्रामसेविका , चंद्रभान सरपे,नामदेव तोगटीवार पोलीस पाटील, उपस्थित होते.
शिबीराचे आयोजक : – ग्राम रक्तदुत रामकृष्ण झाडे, संतोष नागरगोजे मुख्याध्यापक , नेमाजी घोगरे, प्रमोद देव्हारे, नामदेव गेडाम, नितेश कडते, चेतन दिवसे, प्रवीण दंडीकवार तसेच जिल्हा रक्त संकलन टीम मधीम कर्मचारी यांनी सहकार्य केले.