मुंबई, दि. १४ :- ‘मराठी वाङ्मयाच्या सेवेला वाहून घेतलेला उमदा साहित्यव्रती हरपला,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘मनोहर म्हैसाळकर यांनी साहित्यिक चळवळीला वाहून घेतले होते. लेखन, संशोधन आणि सर्जनशील साहित्य निर्मिती बरोबरच त्यांनी क्रीडा क्षेत्रात संघटनात्मक कार्य केले. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्षपदही यशस्वीपणे सांभाळले. […]
Day: November 23, 2024
गोसीखुर्द प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या २६ गावांच्या पुनर्वसनाबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई, दि. १४ :- भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द (ता. पवनी) राष्ट्रीय सिंचन प्रकल्पामुळे बाधीत होणाऱ्या भंडारा विधानसभा क्षेत्रातील २६ गावांच्या पुनर्वसनाबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या गावांच्या पुनर्वसनाच्या मागणीबाबत बैठक झाली. बैठकीस आमदार नरेंद्र भोंडेकर, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान […]
अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे कालव्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई, दि. १४: अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे कालव्याचे काम डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करून या भागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल यासाठी जलसंपदा विभागाने प्रयत्न करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. निळवंडे कालव्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, जलसंधारण विभागाचे […]
भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्यास तत्वत: मान्यता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १४: भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली. यासंदर्भात महारेल मार्फत रेल्वे आणि राज्य सरकार यांच्या ५०-५० टक्के आर्थिक सहभागासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्यासंदर्भात आज मंत्रालयात आढावा बैठक […]
शेतकऱ्यांच्या खात्यात १७ ऑक्टोबर २०२२ रोजी PM किसान योजनेचा १२ वा हप्ता जमा होणार !
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना १२ वा हप्ता (२००० रू) लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही सुरू होणार आहे. यामुळे १७ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता माननीय पंतप्रधानांकडून लाभार्थ्यांशी थेट संवाद आणि १२ वा हप्ता वितरण करतील. प्रधानमंत्री किसान योजनेचे वर्षाला सहा हजार रुपये ज्या ज्या शेतकऱ्यांना येतात त्या सर्व शेतकऱ्यांनी आपली आधार eKYC केली आहे […]