मुंबई, दि. 15- मुंबई शहरात सौंदर्यीकरण, स्वच्छता, इमारती आणि रस्त्यांवरील विद्युत प्रदीपन, कोळीवाड्यांचा विकास आदी माध्यमातून मुंबईचे अधिक सुंदर रूप जगासमोर आणणार असल्याचे मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा पालकमंत्री श्री. केसरकर यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे झालेल्या बैठकीत आढावा घेतला. या बैठकीस महानगरपालिका आयुक्त डॉ.इक्बाल सिंह […]
Day: November 23, 2024
मुलांचे लसीकरण वाढवावे, स्वतंत्र ओपीडी सुरू करावी – सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत
मुंबई, दि. 15 : मुलांचे लसीकरण वाढवा, मुलांसाठी स्वतंत्र ओपीडी सुरू करावी आणि सर्वेक्षण करुन संशयित लक्षणे असणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी मुंबई महानगर पालिका अधिकाऱ्यांना दिले. मंत्री श्री. सावंत यांनी मुंबई महापालिकेमार्फत शहरातील काही भागात राबविण्यात येणाऱ्या गोवर प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक घेतली. […]
१२० अश्वशक्तीवरील सहा सिलेंडर क्षमतेच्या नौकांनाही मिळणार करमुक्त डिझेल कोटा
मच्छिमार सहकारी संस्थांच्या सभासदांना मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडून मोठा दिलासा मुंबई, दि. 15 : राज्यातील 120 अश्वशक्तीवरील सहा सिलेंडर क्षमतेच्या नौकांनाही यापुढे करमुक्त डिझेल कोटा मिळणार आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या या निर्णयाने राज्यातील मच्छिमार सहकारी संस्थांना व त्यांच्या सभासदांना मोठा दिलासा मिळाला आहे. यांत्रिकी नौकांच्या हायस्पीड डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कराची प्रतिपूर्ती नियमानुकूल होणार यांत्रिकी नौकांच्या […]
बल्लारपूर मतदारसंघातील भटक्या विमुक्त समाजाच्या घरकुलांसाठी निधी देणार – इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पाठपुरावा मुंबई, दि. 15 : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर मतदारसंघात यशवंतराव मुक्त वसाहत योजनेच्या माध्यमातून भटक्या विमुक्त समाजाच्या घरकुलांसाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करुन दिला जाईल, असे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. बल्लारपूर मतदारसंघात यशवंतराव मुक्त वसाहत योजनेच्या माध्यमातून निधी मिळण्याबाबत चंद्रपूरचे पालकमंत्री तथा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सहकार, इतर […]
पोहरादेवी जैव उद्यान प्रकल्पाचा आराखडा त्वरित तयार करावा – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 15 : वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी येथे जैव उद्यान उभारण्यात येणार असून यासाठीचा प्रकल्प आराखडा त्वरित तयार करावा, असे निर्देश वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील संत सतगुरु सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र पोहरादेवी जैव उद्यान संदर्भातील आढावा बैठक मंत्री श्री.मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अन्न व […]
अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात भगवान बिरसा मुंडा यांना देवत्व मिळाले; प्रत्येक आदिवासी हा बिरसा मुंडा होण्याची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
नाशिक, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) : आपल्या असाधारण कर्तृत्वाने भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात देवत्व मिळाले, हेच कर्तृत्व अन् देवत्व प्रत्येक आदिवासी बांधवाच्या वाट्याला येण्यासाठी प्रत्येक आदिवासी बांधवाने बिरसा मुंडा होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. येथील गोल्फ क्लब मैदानावर भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनजातीय […]
नागपूर विधिमंडळ परिसर विस्तारीकरणासाठी प्रयत्नशील : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
हिवाळी अधिवेशनाचा विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापतींकडून आढावा नागपूर दि. 15 : नागपूर विधिमंडळ परिसराचे विस्तारीकरण करण्याबाबत प्रयत्नशील असून याबाबतच्या शक्यता पडताळून पाहण्याचे स्थानिक प्रशासनाला निर्देशित करण्यात आले आहे. तसेच अधिवेशन काळात मर्यादित प्रवेश व सुरक्षा व्यवस्था लक्षात घेऊन संसदेप्रमाणे मध्यवर्ती ‘बारकोड ‘ पद्धतीचा अवलंब करणार असल्याची माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज येथे दिली. नागपूरमध्ये […]
तज्ज्ञ मानसेवी प्राध्यापकांच्या मानधनात वाढ
मुंबई, दि. 15 : पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेण्यासाठी औरंगाबाद येथील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था प्रवेशपूर्व परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देते. 11 वी, 12 वीच्या नियमित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा, सशस्त्र सीमा बलासाठी मुलाखती याबरोबरच मैदानी खेळाचे प्रशिक्षणही देते. हे प्रशिक्षण देण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या तज्ज्ञ मानसेवी प्राध्यापकांचे मानधन आता एक हजार रूपये करण्यात आले […]
मुंबई उपनगर जिल्ह्यातील बालकांसाठी तातडीने गोवर लसीकरण मोहीम राबवा – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. 15 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील बालकांसाठी तातडीने गोवर लसीकरण मोहीम राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. हा उपक्रम मुंबई उपनगरातील सर्व वॉर्डमध्ये दिनांक १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मुंबई शहरातील बालकांचे लसीकरण व […]
शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्याला प्राधान्य – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 15 : विद्यार्थी केंद्रस्थानी ठेऊन राज्यात शिक्षणाचा दर्जा उंचावण्याला शासनाचे प्राधान्य आहे. या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात आदर्श शाळा तयार करणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. साम वाहिनी आयोजित ‘सामर्थ्य महाराष्ट्राचे – वेध भविष्याचा, मंथन विकासाचे’, या कार्यक्रमात राज्यातील शिक्षण क्षेत्राविषयी मंत्री श्री. केसरकर यांची मुलाखत घेण्यात आली त्यावेळी ते बोलत […]