मुंबई, दि. 14 – इंग्रजी ही संपर्काची भाषा असली तरीही ती सर्वस्व नाही. मातृभाषेतून दिलेले शिक्षण प्रभावी ठरते त्यामुळे शासन मातृभाषेतून शिक्षणाला प्रोत्साहन देत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ‘बालभारती’ हा चित्रपट याच विषयावर आधारित असल्याने तो लोकप्रिय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते ‘बालभारती’ चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक […]
Day: November 23, 2024
राज्यातील तरुणांना जलसंधारण तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीवर संशोधन आणि सामाजिक कार्याची संधी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 14 : जलसंधारण तसेच पर्यावरण पूरक जीवनशैली यावर संशोधन करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी युनिसेफ आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सात लाख तरुणांना हवामान बदलाचे योद्धे म्हणून कार्य करण्याची संधी आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. आज मुंबई विद्यापीठ येथे उच्च […]
गोद्री येथील कुंभ महोत्सवसाठी चोख व्यवस्था करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
मुंबई, दि. १४ : जळगाव जिल्ह्यातील गोद्री येथील अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३ साठी देशभरातून अंदाजे 50 ते 60 हजार भाविक अपेक्षित आहेत. येणाऱ्या भाविकांसाठी सर्व व्यवस्था चोखपणे करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्री येथे होणाऱ्या ‘अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३‘ बाबत सह्याद्री अतिथगृह येथील पूर्वतयारी […]
केंद्र सरकारच्या मदतीने वेळेत योजना पूर्ण करण्यास प्राथमिकता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जलशक्ती मंत्रालयाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राने पथदर्शी भूमिका बजावावी – केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत मुंबई, दि. 14 : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये राज्याने प्रभावी आणि पथदर्शी भूमिका बजावावी, अशी अपेक्षा केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी व्यक्त केली. दरम्यान, केंद्र सरकारकडून विविध योजनांच्या पूर्ततेसाठी भरीव सहाय्य मिळत असून, राज्यातील विविध योजना केंद्र […]
पंडित नेहरू यांच्या जयंतीनिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन कार्यक्रम
मुंबई, दि. 14 : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदानंद जाधव, सह निबंधक दुतोंडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
झोपडपट्टी पुनर्वसन वसाहतीमध्ये अंगणवाडीला जागा द्या – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. 14 :- झोपडपट्टी पुनर्वसन वसाहतीमध्ये अंगणवाडीला जागा देण्याबाबत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. अंधेरी पूर्व येथील के पूर्व वॉर्ड येथे झालेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी आमदार पराग आळवणी तसेच सर्व विभागांचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री श्री. लोढा म्हणाले […]
पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन
ठाणे, दि. 14 (जिमाका) – देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या निवासस्थानी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पोलीस सहआयुक्त दत्तात्रय कराळे, तहसीलदार राजाराम तवटे आदी उपस्थित होते. पंडित नेहरू यांचा जन्मदिन 14 नोव्हेंबर हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त मुख्यमंत्री […]
महिला खासदार, आमदार शिष्टमंडळाची राज्यपालांसोबत भेट
मुंबई, दि. 14 : राज्यातील महिला खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. यावेळी खासदार फौजिया खान, खासदार जया बच्चन, खासदार प्रियांका चतुर्वेदी, खासदार वंदना चव्हाण, आमदार मनीषा कायंदे, आमदार कु.अदिती तटकरे, आमदार सुमनताई पाटील, आमदार ऋतुजा लटके तसेच माजी आमदार विद्या चव्हाण आदी उपस्थित होते.
इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स यांच्यासमवेत राज्य शासनाचा करार
विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी ‘संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’ कार्यक्रम मुंबई, दि. 14: राज्य शासनाच्या विद्यार्थी समग्र विकास धोरणांतर्गत राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (आयएपी) सोबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सामंजस्य करार केला आहे. शासकीय शाळांमधून बालकांच्या आरोग्याबाबत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा करारात समावेश आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या […]
महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती २०२३
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर वित्त विभागाच्या दिनांक ०४ मे, २०२० च्या शासन निर्णयान्वये सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग वगळता अन्य विभागातील पदभरतीवर निर्बंध घालण्यात आले होते. सामान्य प्रशासन विभागाने दि. ४ मे २०२२ च्या मार्गदर्शक सूचनांस अनुसरून ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट क संवर्गाच्या पदभरतीबाबत दि. १० मे २०२२ […]