ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

बंदरांवर दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. 16 : महाराष्ट्र सागरी मंडळाअंतर्गत येणाऱ्या बंदराचा दर्जा व सोयीसुविधा वाढविण्यासाठी तसेच बंदरांची रस्ते, रेल्वे मार्गासोबत जोडणी करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. आज मंत्रालयात आयोजित महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाअंतर्गत येणाऱ्या बंदरांच्या आढावा बैठकीत मंत्री श्री. भुसे बोलत होते. बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी यांनी विभागनिहाय […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

औरंगाबाद औद्योगिक क्षेत्रात आगामी काळात मोठी गुंतवणूक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 16 : उद्योगांना आवश्यक असणारे उद्योगस्नेही वातावरण देण्याचे काम राज्य सरकार करत असून येत्या काळात औरंगाबाद आणि राज्याच्या विविध भागात मोठी गुंतवणूक करण्यासाठी उद्योजक पुढे येत आहेत. त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासन करेल आणि त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीला चालना मिळेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या जे.जे. रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची मुलाखत

मुंबई, दि. 16 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरुवार, दि. 17 नोव्हेंबर 2022 रोजी सायं 7.30 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल. यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR मुंबई, भिवंडी, मालेगाव (जि. नाशिक) परिसरात गोवरचा प्रादुर्भाव […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

कॉप-२७ परिषद : पर्यावरण रक्षणासाठी महाराष्ट्रात ‘माझी वसुंधरा अभियान’- पर्यावरण सचिव प्रवीण दराडे

मुंबई, दि. 16 :- शासन नागरिकांच्या सक्रिय सहभागातून पर्यावरणाच्या रक्षणासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान राबवित आहे. हे अभियान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘मिशन लाईफ’ला पूरक असून या माध्यमातून जागतिक पातळीवरील वातावरणीय कृती आराखड्याला समर्थन दिले जात असल्याचे राज्याच्या पर्यावरण विभागाचे सचिव प्रवीण दराडे यांनी सांगितले. इजिप्तमधील शर्म अल-शेख येथे आयोजित कॉप – 27 जागतिक परिषदेत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुंबई शहर ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन

वाचन संस्कृती घरोघरी-तिथे फुलते ज्ञान पंढरी : ग्रंथ दिंडीतून दिला वाचनाचा संदेश मुंबई, दि. 16 : वाचाल तर वाचाल, ग्रंथ हेच गुरू, ग्रंथ देवो भव, ग्रंथ आमुचे साथी- ग्रंथ आमुचे हाती, ग्रंथ उजळती-अज्ञानाच्या अंधाऱ्याच्या राती, वाचन संस्कृती घरोघरी- तिथे फुलती ज्ञान पंढरी, पुस्तकांशी करता मैत्री- ज्ञानाची मिळते खात्री, असा संदेश देणारी ग्रंथ दिंडी काढत आजपासून […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्यातील गड-किल्ल्यांच्या विकासावर भर देणार – पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. 16 : रायगड विकास प्राधिकरणामार्फत रायगड किल्ला विकासासाठी पर्यटन विभागाकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल. त्याचबरोबर राज्यातील सर्व गड-किल्ल्यांच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी  रायगड  विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती यांना  दिली. राज्यातील गड किल्ल्यांच्या विकासाबाबत मंत्रालयात पर्यटन मंत्री श्री.लोढा यांच्या उपस्थितीत बैठकीचे  आयोजन करण्यात आले. यावेळी रायगड […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

जर्मनीचे महावाणिज्यदूत अचिम फॅबिग यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

मुंबई, दि. 16 : जर्मनीचे मुंबईतील महावाणिज्यदूत अचिम फॅबिग यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस आणि श्री. फॅबिग यांच्यादरम्यान यावेळी महाराष्ट्रातील गुंतवणुकीसंदर्भात चर्चा झाली. जर्मनीमधील उद्योजकांनी राज्यात अधिकाधिक गुंतवणूक करावी, राज्य शासनामार्फत त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले. येत्या सहा महिन्यांत जर्मनीतील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राजगृहाचा ऐतिहासिक ठेवा जोपासणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानाला मुख्यमंत्र्यांची भेट मुंबई, दि. 16 : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या दादर येथील हिंदू कॉलनी परिसरातील ‘राजगृह’ निवासस्थानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट दिली. राजगृहाचा ऐतिहासिक ठेवा जोपासला जाईल, असे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. राजगृहतील डॉ.बाबासाहेब आणि रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस […]