मुंबई दि,२१ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे लोकार्पण आज करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर यांच्या वतीने हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालयासमोर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन, […]
Day: November 23, 2024
हुतात्मा स्मृती दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून अभिवादन
मुंबई ,दि. २१ : हुतात्मा स्मृती दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर,पर्यटन, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलिस आयुक्त […]
पुण्याच्या नवले ब्रिजवरील अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून दखल
मुंबई दि 20 : पुणे येथे नवले ब्रिजवर आज रात्री टँकरच्या धडकेने अनेक वाहने दुर्घटनाग्रस्त होऊन झालेल्या अपघाताविषयी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकडून माहिती घेतली आहे. हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला तेही तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. अपघातामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर झालेली वाहतूक […]
जागतिक बालदिन : ‘चला खेळूया’ उत्सवात ४ हजारांहून अधिक मुलांचा सहभाग
महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोग, युनिसेफचे आयाेजन मुंबई, दि. २० : खेळण्याच्या अधिकाराचा पुनरुच्चार करत जागतिक बाल दिनानिमित्त रविवारी सकाळी चार हजारांहून अधिक मुले प्रियदर्शनी पार्क येथील सुरू असलेल्या ‘चला खेळूया’ उत्सवामध्ये सहभागी झाली होती. फुटबॉल, टेनिस, क्रिकेटचे सामने, मल्लखांब आणि अनेक साहसी खेळांमध्ये मुलांनी आपला सहभाग नोंदवला. महाराष्ट्र बालहक्क संरक्षण आयोग, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई […]
पोलिसांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा देण्यासाठी पुण्यात क्रीडा संकुल उभारणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
७१ व्या अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर-२०२२ चा समारोप पुणे, दि.२०: पोलिसांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा देण्यासाठी पुणे येथे सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुल आणि क्रीडा वसतीगृह उभारण्यात येईल; आणि या संबंधीच्या प्रस्तावाला लवकरच मान्यता देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वानवडी येथे एसआरपीएफ गट-२ परिसरात आयोजित ७१ व्या अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर-२०२२ समारोप कार्यक्रमात […]
पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन पुणे दि.२० : पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका राहील आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पिंपरी चिंचवडच्या थेरगाव येथील कै.शंकरराव गावडे सभागृहात आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, […]
‘ग्रीन फिल्ड महामार्गा’मुळे अहमदनगर लॉजिस्टिक कॅपीटल बनणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
अहमदनगर शहरातील ३ किलो मीटर लांबीच्या चौपदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण येत्या काळात ३० हजार कोटींच्या कामांमुळे विकासाला चालना अहमदनगर दि. 19 नाव्हेंबर (जिमाका वृत्तसेवा):- ‘ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस-वे’ च्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील विकासाला गती मिळणार असून रोजगार वाढणार आहे. जिल्हा लॉजिस्टिक कॅपीटल बनणार आहे. येत्या काळात जिल्ह्यात प्रस्तावित ३० हजार कोटींच्या कामांमुळे विकासाला चालना मिळेल. असे प्रतिपादन […]
ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांच्या निधनाने इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारी अभिनेत्री गमावली – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शोकसंवेदना
मुंबई, दि.१९: : अनेक दशकं हिन्दी सिनेसृष्टी आणि दूरदर्शन वर अधिराज्य गाजविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांच्या निधनाने कला आणि चित्रपट क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे शब्दात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तबस्सुम यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तबस्सुम म्हणजे हास्य चैतन्य आणि सुगंध. अगदी नावाप्रमाणे आयुष्य व्यतीत करुन इतरांना “फूल खिले हैं गुलशन गुलशन” […]
ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजली
मुंबई, दि. 19 : तबस्सुम यांच्या निधनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका आणि मुलाखतकार आपण गमावली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, बाल कलाकार म्हणून कारकीर्द सुरू केलेल्या तबस्सुम यांनी रसिकांच्या मनात आपले स्वतःचे एक विशिष्ठ स्थान निर्माण केले होते. एक चांगल्या मुलाखतकार म्हणून त्यांनी अनेक […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बेबी तबस्सुम यांना श्रद्धांजली
‘सदाबहार, चतुरस्त्र कलायात्री गमावली मुंबई, दि. 19 : आपल्या सदा हसतमुख आणि प्रसन्न अभिनयाने चित्रपट, दूरचित्रवाणी या क्षेत्रात अमीट छाप सोडणारी चतुरस्त्र कलायात्री गमावली, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेत्री बेबी तबस्सुम यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारतीय चित्रपट आणि पुढे दूरचित्रवाणी क्षेत्रात देखील आपल्या चतुरस्त्र कामगिरीने बेबी तबस्सुम यांनी एक काळ गाजवला. बालकलाकार ते मार्गदर्शकाच्या भूमिकेतील […]