नागपूर दि. 23 : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथील झिरो माईल्स परिसरातील गोवारी शहीद स्मारकाला भेट देऊन श्रद्धांजली वाहिली. अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात या मागणीसाठी आजच्याच दिवशी 23 नोव्हेंबर रोजी चेंगराचेंगरी होऊन 114 गोवारी बांधव शहीद झाले होते. दरवर्षी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून गोवारी बांधव या ठिकाणी अभिवादन सोहळ्याला उपस्थित असतात. आज 28 वा गोवारी शहीद स्मृती दिवस आहे. उपमुख्यमंत्री […]
Day: November 23, 2024
‘ओरल हेल्थकेअर’साठी अधिकाधिक निधी उपलब्ध करणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दंत महाविद्यालयाला अत्याधुनिक वसतिगृह देणार नागपूर, दि. 23 : मध्य भारतामध्ये नागपूर व परिसरात मोठ्या प्रमाणात मौखिक आजार (ओरल डिसीज) व कर्क रोगाचे (कॅन्सरचे) आजार बळावले आहेत. या परिसरात ओरल हेल्थकेअरसाठी सर्वसमावेशक उपचार पद्धती अस्तित्वात असणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य शासन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. शासकीय दंत महाविद्यालयातील […]
अकोला हे देशात दळणवळणाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अकोला-अकोट पॅसेंजर रेल्वे सेवेमुळे उत्तरेकडील राज्ये अकोल्याशी जोडण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल अकोला, दि.23 (जिमाका)-: अकोला रेल्वे स्थानक हे दक्षिण व उत्तरेकडील राज्यांना जोडणारे महत्त्वाचे स्थानक आहे. अकोला-अकोट पॅसेंजर रेल्वे सेवेमुळे उत्तरेकडील राज्ये अकोल्याशी जोडण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असून येत्याकाळात देशात हा जिल्हा दळणवळणाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. अकोला-अकोट पॅसेंजर (गाडी […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री साईबाबा समाधी दर्शन
अहमदनगर, दि. 23 :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक आज शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा […]
पाईप लाईन योजना अनुदानावर मिळेल PVC Pipe असा करा अर्ज
आजच्या लेखामध्ये पाईप लाईन योजना संदर्भात माहिती जाणून घेवूयात pvc pipeline scheme. तुमच्या शेतात विहीर असेल, विहिरीवर मोटार असेल पाणी उपसा करण्यासाठी वीज देखील असेल परंतु विहिरीतील बोअरमधील किंवा शेततळ्यातील पाणी पिकांना देण्यासाठी पाईप लाईन केलेली नसेल तर मात्र पिकांना पाणी देण्यासाठी तुमची पंचाईत होऊ शकते. पिकांना जर वेळेवर पाणी दिले गेले नाहीत तर शेतकरी […]
लहान मुलांच्या आधार कार्डमध्ये मोठा बदल, ‘युआयडीएआय’चा महत्वपूर्ण निर्णय
आधार कार्ड आता लहान मुलांसाठीही अनिवार्य आहे. 5 वर्षांखालील मुलांकडे आधार कार्ड असणं अनिवार्य केले आहे. त्यास ‘बाल आधार कार्ड’ असं म्हटलं जात असून, त्याचा रंग निळा आहे. शाळेत प्रवेश घेण्यापासून विविध कामांसाठी हे आधार कार्ड वापरले जाते. आता तर थेट नवजात बालकालाही जन्मासोबतच आधार नोंदणी मिळणार आहे. आधार कार्ड जारी करणाऱ्या ‘यूआयडीएआय’ नुकतेच बाल […]