ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

वैद्यकीय शिक्षण विभागातील गट ब, क संवर्गातील साडेचार हजार पदे भरणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. २५ : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्थ सरळसेवेची गट-ब (अराजपत्रित), गट-क तांत्रिक / अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील साधारणत: ४ हजार ५०० पदे भरण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी दिली. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्थ असलेल्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, आयुष संचालनालय, अन्न व औषध प्रशासन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

रस्ते अधिक दर्जेदार होण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवा – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

ग्रामसडक योजनेचा राज्यस्तरीय आढावा मुंबई, दि 25 : ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून होणारे रस्ते अधिक दर्जेदार होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात येत आहेत. यात गुणवत्तेबाबत कुठलीही तडजोड करू नये. ग्रामीण भागामध्ये रस्त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी केले. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

कृषी महोत्सवात मुख्यमंत्र्यांकडून लम्पी चर्मरोग नियंत्रणाबाबत चर्चा

सातारा, दि. २५ : देशाचे माजी उपपंतप्रधान स्व.यशवंतरावजी चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड शेती उत्पन्न बाजार समिती आणि जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषि, औद्योगिक व पशू पक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या स्टॉलला भेट देऊन सातारा जिल्ह्यातील गाय वर्गातील लम्पी चर्मरोगाच्या प्रादुर्भाव नियंत्रणाबाबत माहिती घेऊन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

देशावर हल्ला करणाऱ्यांना सर्व शक्तीनिशी नेस्तनाबूत करु – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि 25:- देशाची आर्थिक राजधानी आणि देशाच्या सार्वभौमत्वावर झालेला 26/11 चा हल्ला हा कधीही भरून न येणारा घाव आहे. या कटू आठवणी न मिटणाऱ्या आहेत. मात्र असे दुःसाहस करणाऱ्यांना सर्वशक्तीनिशी नेस्तनाबूत केले जाईल हे देशाने कृतीतून दाखवून दिले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हॉटेल ताजमहल पॅलेस येथे आयोजित ’26/11 मुंबई संकल्प’ या कार्यक्रमात श्री.फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुंबईवर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

सीमा भागातील ८६५ गावांमधील संस्था, संघटनांना बळ देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय करण्याबाबतचा शासन निर्णय जारी मुंबई, दि. २५ : महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील विविध संस्था आणि संघटना यांना मोठं बळ मिळणार आहे. या भागातील ८६५ गावांमधील सामाजिक, शैक्षणिक, धर्मादाय, सांस्कृतिक तसेच निम सार्वजनिक संस्था व संघटनांना देखील मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीमाप्रश्नी अलिकडेच सह्याद्री अतिथीगृहात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

पुणे विमानतळावर इंटिग्रेटेड कार्गो टर्मिनल सुरु करणार – केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

पुणे,दि.२५: कला, संस्कृती, व्यापार आणि शिक्षण क्षेत्रात पुण्याचा जागतिक पातळीवर लौकिक आहे. देश विदेशातील नागरिक पुण्यात येत असल्याने विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळावर इंटिग्रेटेड कार्गो टर्मिनल सुरु करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले. लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे उभारण्यात आलेल्या मल्टिलेव्हल व अत्याधुनिक पार्किंग सुविधा देणाऱ्या एरोमॉलचे उद्घाटन केंद्रीय मंत्री […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘पंचभौतिक महोत्सवा’ला राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोल्हापूर ये सुमंगलम पंचभौतिक महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण व पंचगंगा नदीची आरती कोल्हापूर, दि.25 (जिमाका) : पर्यावरण रक्षण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. कण्हेरी मठ येथील ‘पंचभौतिक महोत्सव’ यशस्वी होण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही देऊन पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा हा महोत्सव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिस्टिलरी प्लांटचे उद्घाटन

कोल्हापूर दि २५ ( जिमाका) हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या ३० केएलपीडी क्षमतेच्या डिस्टिलरी प्लांटचे उद्घाटन तसेच १ लाख ६२ हजाराव्या साखर निर्मिती पोत्याचे पूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले . यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार प्रा . संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने , राज्य नियोजन मंडळाचे कार्य. अध्यक्ष राजेश क्षीरसागर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी जनहिताचे निर्णय घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर, दि.25 (जिमाका) :  शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या कष्टाची जाणीव असणारे हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्यांचे हित जोपासण्यासाठी या शासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून यापुढेही राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी जनहिताचे निर्णय घेतले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर आयोजित केलेल्या शेतकरी जनसंवाद मेळाव्यात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. […]