ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

२ डिसेंबरला नियोजित संयुक्त चाळणी परीक्षा – २०२२ प्रवेश प्रमाणपत्र एमपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध

मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शुक्रवार, दिनांक ०२ डिसेंबर २०२२ रोजी नियोजित विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी, सहायक प्रशासकीय अधिकारी व सहायक प्रशासन अधिकारी या सहा संवर्गाच्या संगणक प्रणालीवर आधारित संयुक्त चाळणी परीक्षेकरीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन  अर्जप्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोडकरुन प्रिंट […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलिसांचा सत्कार

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहिली मुंबई, दि. 26 : २६/११  च्या दहशतवादी हल्ल्यावेळी धाडसी कामगिरी बजावलेल्या पोलीस कर्मचारी, बेस्ट कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले. पोलिस बॉइज चॅरीटेबल ट्रस्ट संचलित महाराष्ट्र पोलिस बॉइज संघटनेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गेट वे ऑफ इंडिया येथे २६/११ हल्ल्यातील शहीद वीरांच्या स्मरणार्थ श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

विक्रम गोखले यांच्या निधनाने एक निष्ठावान कलातपस्वी हरपला – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 26 : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने एक निष्ठावान कलातपस्वी हरपल्याची शोकभावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. मराठी रंगभूमी, मराठी व हिंदी चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमात त्यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या बळावर आपले कर्तृत्व सिद्ध केले. भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या विक्रम गोखले यांनी अभिनयासोबत लेखन व दिग्दर्शन देखील केले […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

विक्रम गोखलेंच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.26 : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले असल्याची शोकसंवेदना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने सिनेमा जगत आणि नाट्यसृष्टीचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले आहे. एक चतुरस्त्र अभिनेता, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना श्रद्धांजली

अभिनयातील बहुआयामी ‘विक्रम’ काळाच्या पडद्याआड मुंबई, दि. २६ :- ‘भेदक नजर, भारदस्त आवाज आणि संयत अभिनयाने वैविध्यपूर्ण अशा भूमिकांचा नावाप्रमाणेच ‘विक्रम’ करणाऱ्या प्रतिभावंत महान अभिनेत्याचे निधन ही कला क्षेत्राची हानी आहे, अशी शोकमग्न भावना व्यक्त करत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, विक्रम गोखले यांना घरातूनच […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

विक्रम गोखले यांनी अभिनयाचे मापदंड निर्माण केले – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. 26 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. रंगभूमी तसेच चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांनी अभिनय एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला होता. एकापेक्षा एक सरस भूमिकांमधून त्यांनी उत्कृष्ट अभिनयाचे मापदंड प्रस्थापित केले. हिंदी व मराठी चित्रपट तसेच रंगभूमीवर प्रदीर्घ काळ काम […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

भारतीय संविधान दिनानिमित्त मंत्रालयात प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन

मुंबई, दि. 26 : भारतीय संविधान दिनानिमित्त मंत्रालयामध्ये आज भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करुन संविधान दिन साजरा करण्यात आला. माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक जयश्री भोज यांच्यासह उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज.जी.वळवी, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव,  किरण देशपांडे,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संविधान प्रास्ताविकेचे वाचन

समता पर्वचा प्रारंभ, सहभागाचे आवाहन मुंबई, दि. २६ :- संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. यावेळी मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. संविधान दिन ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत समता पर्व साजरा करण्यात येत आहे. या पर्वानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

संविधान दिन : राजभवन येथे संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन

मुंबई, दि. 26 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी संविधान दिनानिमित्त राजभवन येथे राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांसमवेत भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.  दरवर्षी दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 000 Governor reads out Preamble of Constitution Mumbai 26 : The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari read out the preamble […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

२६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना राज्यपाल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची मानवंदना

मुंबई, दि. २६ : मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहिद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील वीरांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानवंदना दिली. तसेच त्यांच्या स्मृतीस्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सर्व मान्यवरांनी तसेच गणवेशातील अधिकारी व पोलीस जवानांनी हुतात्म्यांना सलामी दिली. […]