मुंबई, दि.17 : राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाले होते. बाधित शेतकऱ्यांना प्रचलित दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत दुपट्टीने मदत देण्याचा राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला होता, त्यानुसार औरंगाबाद आणि पुणे विभागासाठी १२८६ कोटी ७४ लाख ६६ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यामुळे लाखो बाधित […]
Month: November 2024
लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात ६ हजार ६७७ पशुपालकांच्या खात्यांवर १७.१६ कोटी रुपये जमा – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह
मुंबई, दि. १७ : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा ६ हजार ६७७ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. १७.१६ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. श्री. सिंह म्हणाले, राज्यामध्ये दि. १७ नोव्हेंबर, २०२२ अखेर 34 जिल्ह्यांमधील एकूण 3 हजार 608 संसर्गकेंद्रांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 263755 […]
ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मंत्रीमंडळाची मान्यता; पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा
मुंबई, दि. 17 :– जिल्हा परिषदांतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांना रुपांतरीत नियमित अस्थायी आस्थापनेवर घेण्यासाठी पूर्वलक्षी प्रभावाने अधिसंख्य पदे निर्माण करण्यास राज्य मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतन/भत्ते व सेवानिवृत्ती वेतनासाठी जिल्हा परिषदांना अनुदान उपलब्ध करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा केला होता. पाणीपुरवठा व स्वच्छता, ग्रामविकास आणि वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सातत्याने बैठका […]
स्वच्छ, सुंदर, आरोग्यदायी मुंबईसाठी प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचे लोकार्पण मुंबई, दि. १७ : – मुंबई शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी व्हावे असे धोरण आहे. यात धारावीचा पुनर्विकास हा महत्त्वाचा असून, येत्या काही काळात जगाचे लक्ष वेधून घेईल अशी वसाहत प्रत्यक्षात येईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. तसेच मुंबईतील कुणाही गरजूला वैद्यकीय उपचार मिळाले […]
‘दिलखुलास’ कार्यक्रमात कुलगुरु प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांची दि. १८, १९ नोव्हेंबरला मुलाखत
मुंबई, दि. 17 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ व सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठाचे कुलगुरु तथा मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन व ‘न्यूज ऑन एआयआर‘ या ॲपवर शुक्रवार दि. १८ व शनिवार दि. १९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते […]
मराठीच्या विकासासाठी एकत्रितरित्या कार्य करणे गरजेचे – माजी खासदार, साहित्यिक डॉ. भालचंद्र मुणगेकर
मुंबई, दि. 17 : “ग्रंथालये ही मराठी वाचन संस्कृतीचे, विचार मंथनाचे, साहित्याचे, नाटक-शास्त्राचे, भावजीवनाची केंद्र व्हावीत. मराठीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितरित्या कार्य करावे”, असे प्रतिपादन माजी खासदार, साहित्यिक डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात मुंबई शहर ग्रंथोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले […]
‘सागरमाला’अंतर्गत राज्यातील चार नवीन प्रकल्पांना मंजुरी – बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. 17 : केंद्र सरकारने सागरमाला योजनेंतर्गत महाराष्ट्रातील चार नवीन जेट्टी प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामध्ये मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ क्लब अपोलो बंदर, जंजीरा बंदर, पद्मदुर्ग बंदर व सुवर्णदुर्ग येथील बंदरांचा समावेश आहे. राज्यातील जलवाहतूक वाढणार असून याचा लाभ प्रवासी, मालवाहतूक आणि पर्यटकांना होणार आहे. जलवाहतूक सुरू होणार असल्याने रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होणार असल्याची माहिती […]
सेवा पंधरवडा काळात ९५ टक्के अर्ज निकाली; अर्ज निकाली काढण्याची मोहिम सुरूच ठेवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १७ : राज्यात दि. १७ सप्टेंबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवडा कालावधीत विविध १४ सेवा आणि पोर्टलवरील प्रलंबित प्रकरणांचा ९५ टक्के निपटारा करण्यात आला आहे. या मोहिमेत एकूण ८३ लाख ५७ हजार २१८ प्रलंबित अर्जांपैकी ७९ लाख ४५ हजार २२ अर्ज निकाली काढण्यात आले. याबद्दल आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादरीकरण […]
वैद्यकीय मदत कक्ष पोहचवण्याचा संकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून चार महिन्यात ६ कोटी ४० लाखांची मदत राज्याच्या कानाकोपऱ्यातील गरजू रुग्णांपर्यंत मुंबई दि. १७ – जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील गरजू रुग्णांपर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मदत पोहचवण्याचा संकल्प करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या निर्देशानुसार कक्षाचे कार्य सुरु […]
मंत्रिमंडळ बैठक
मुंबईतील भांडवली मूल्याधारित मालमत्ता दर यावर्षी न बदलण्याचा निर्णय कोविडमुळे झालेल्या विपरीत परिणामांमुळे मुंबईतील भांडवली मूल्याधारित मालमत्ता दर सध्या म्हणजे २०२२-२३ करिता न सुधारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याप्रमाणे मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ मधील कलम १५४(1ड) मध्ये सुधारणा करण्यात येईल. कोविडमुळे लागू केलेल्या टाळेबंदी तसेच प्रादुर्भावाच्या […]