मुंबई, दि. 15 : संसदीय लोकशाहीच्या कार्यान्वयनात युवकांनी सहभाग घ्यावा या दृष्टीने सुरु केलेल्या अभिरूप संसद उपक्रमाच्या माध्यमातून देशाला परिपूर्ण नागरिक, उत्तम लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रात चांगले नेतृत्व लाभेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. नेहरू युवा केंद्राच्या महाराष्ट्र व गोवा शाखेने युनिसेफ महाराष्ट्राच्या सहकार्याने मंगळवारी आयोजित पहिल्या राज्यस्तरीय युवा अभिरूप संसदेला संबोधित […]
Month: November 2024
‘दिलखुलास’ कार्यक्रमात जे. जे. रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची १६ व १७ नाेव्हेंबर रोजी मुलाखत
बई, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात जे. जे. रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर बुधवार, दि. 16 व गुरुवार दि.17 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल. मुंबई, भिवंडी, मालेगाव […]
गोवर संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ करण्याचे मुख्यमंत्र्यांचे पालिकेला निर्देश
मुंबई, दि. १५ : गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गोवर संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वूमीवर मुख्यमंत्र्यांनी मनपा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याशी दूरध्वनीवरून बोलून सूचना दिल्या. तसेच पालिकेचा आरोग्य विभाग कोणती खबरदारी घेत आहे […]
बालभवनच्या उपक्रमांची व्याप्ती राज्यभर वाढविणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 14 : सध्या मुंबईत होत असलेल्या बालभवनच्या उपक्रमांची व्याप्ती येत्या वर्षापासून राज्यभरात वाढविण्यात येणार असून त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज केली. मंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन मुंबईच्या वतीने आयोजित विविध सहशालेय स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिक वितरित करण्यात आली. […]
राज्यामध्ये लम्पी चर्मरोगाच्या सद्यस्थितीवर केंद्रीय संशोधन संस्थांकडून मार्गदर्शन घेण्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश
मुंबई, दि. 14 : लम्पी रोगाच्या लक्षणांची तीव्रता लक्षात घेता रोगावर नियंत्रण मिळवण्याकरीता प्रभावीपणे उपाययोजनांबाबत महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या तज्ज्ञ पथकाने संशोधन करावे, तसेच राज्यामध्ये लम्पी चर्मरोगाच्या सद्यस्थितीवर केंद्रीय संशोधन संस्थांकडून मार्गदर्शन घेण्यात यावे असे निर्देश महसूल ,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल यांनी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव आयुक्त पशुसंवर्धन […]
देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी नवीन संशोधनाला चालना देणे आवश्यक – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
संस्कार आणि संस्कृती जपण्यासाठी मातृभाषा महत्त्वाची – केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार पदविका व पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या मराठी भाषेतील पुस्तकांचे प्रकाशन मुंबई, दि. 14 : भारत आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सकल राष्ट्रीय उत्पादनात माहिती तंत्रज्ञानाचे योगदान मोठे आहे. आत्मनिर्भर भारताच्या मजबूत पायाभरणीसाठी आणि देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी नवीन संशोधनाला चालना देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र […]
पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन
मुंबई, दि. 14 : स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी पंडित नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव विलास आठवले, शिवदर्शन साठये, श्रीमती मेघना तळेकर, राजेश तारवी, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी […]
उत्तराखंड व महाराष्ट्र येथील उद्योग संघटनांमध्ये उद्योग वाढीसाठी करार
राज्यपाल कोश्यारी व उत्तराखंडच्या उद्योग मंत्र्यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या महाराष्ट्र चेंबर व सिडकुल उत्पादक संस्था उत्तराखंड यांच्यात कराराचे आदानप्रदान मुंबई, दि. 14 : उत्तराखंड व महाराष्ट्र राज्यातील व्यापार संघटनांमध्ये सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने सोमवारी (दि. १४) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर तसेच […]
बालदिनाच्या सोहळ्यात मुख्यमंत्री रमले मुलांमध्ये..
पांढऱ्या रंगाचेच कपडे का, दाढी का ठेवता.. ? मुलांचे कुतूहल अन् मुख्यमंत्र्यांची खुमासदार उत्तरे मुंबई, दि. 14 : परळच्या क्षा.म.स. संस्थेच्या डॉ. शिरोडकर शाळेमधील विद्यार्थ्यांना आज बालदिनाची अनोखी भेट मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्षात शाळेत आले.. त्यांनी मुलांशी गप्पा मारल्या..त्यांच्या मनातल्या प्रश्नांना थेट उत्तरे देताना मी याठिकाणी मुख्यमंत्री म्हणून नाही तर तुमच्यातलाच एक होऊन शाळेच्या आठवणी […]
प्रतिभावंत अभिनेता हरपला – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 14 : मराठीसह हिंदी मालिका, सिनेमांमध्ये सहज अभिनय, शब्दांवरील पकड आणि स्पष्ट शब्दोच्चार यामुळे ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे प्रतिभावंत अभिनेता हरपला असल्याची भावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. मंत्री श्री. मुनगंटीवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, मालिका आणि सिनेमांबरोबर अनेक नाटकांत काम केलेल्या श्री. शेंडे यांनी दोन दशकांहून अधिक […]