मुंबई दि. ४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २१ ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्यसेवा (पूर्व) परीक्षा-२०२२ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.मुख्य परीक्षा २१, २२ व २३ जानेवारी, २०२३ रोजी घेण्यात येणार असल्याचे आयोगाचे […]
Month: November 2024
लोकसेवा आयोगाकडून सरळसेवा भरतीकरिता १ व २ डिसेंबरला चाळणी परीक्षा
मुंबई, दि.४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीकरिता विविध संवर्गासाठी संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा १ व २ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षा योजना, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्याप्रमाणे राहणार आहे. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षांची कार्यपद्धत, परीक्षेचे ठिकाण, दिनांक इत्यादी तपशील स्वतंत्रपणे […]
‘यूपीएससी’ परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन; प्रवेश प्रक्रिया सुरु
मुंबई, दि. ४ : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू झाली. ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज २५ नोव्हेंबरपर्यंत भरता येणार असल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.के.एस.जैन यांनी दिली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, […]
कृष्ण कान्हाई यांच्या चित्रातून साक्षात भगवान श्रीकृष्णाचे दर्शन – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
पद्मश्री कृष्ण कान्हाई यांच्या चित्र प्रदर्शनाला सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट मुंबई, दि. ४ : पद्मश्री कृष्ण कान्हाई यांनी साकारलेल्या चित्रांमधून साक्षात भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घडते, अशी भावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. आपल्या चित्रांमध्ये सोन्याचा वापर करून त्या चित्रांना सुवर्णापेक्षा जास्त किंमत मिळवून दिली आहे. या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून जमा […]
राज्य कला प्रदर्शनासाठी २२ नोव्हेंबरपर्यंत कलाकृती सादर करण्याचे आवाहन
मुंबई, दि. 4 :- 62 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (व्यावसायिक कलाकार विभाग) जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शात चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या कलावंतांकडून ऑनलाईन कलाकृती मागविण्यात येत आहेत. या प्रदर्शात पारितोषिकपात्र कलाकृतींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांप्रमाणे एकूण 15 पारितोषिके देण्यात येणार […]
ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी नवीन भाडेदराप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीटर रिकॅलिब्रेट करून घेण्याचे आवाहन
मुंबई, दि. 04 : ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधरकांनी वाहनाचे इलेक्ट्रॉनिक फेर मीटर 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंत रिकॅलिब्रेट करुन घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) यांनी केले आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाची नुकतीच बैठक झाली. ऑटो रिक्षा व टॅक्सी धारकांनी आकारावयाच्या भाडेदर वाढीस मान्यता दिली आहे. यामध्ये ऑटो रिक्षांसाठी प्रथम 1.5 किलोमीटरसाठी […]
अंधेरी पूर्व मतदारसंघात राबविलेल्या ‘घरुन मतदान’ उपक्रमात नोंदणीकृत ज्येष्ठ मतदारांपैकी ९१ टक्के मतदारांचे मतदान
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाने यशस्वीपणे राबविला उपक्रम मुंबई उपनगर, दि. ४ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार राबविण्यात आलेल्या ‘घरून मतदान’ या उपक्रमांतर्गत ‘अंधेरी पूर्व’ मतदार संघातील ४३० मतदारांनी सहमती दर्शवली होती. यापैकी तब्बल ९१ टक्के मतदारांनी म्हणजेच […]
शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सोलापूर, दि. 4 (जि. मा. का.) : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना वीजेची कोणतीही अडचण भासणार नाही, यासाठी वीजेचे सर्व फिडर सौरउर्जेवर आणणार आहे. यातून चार हजार मेगावॅट वीजेचे उद्दिष्ट ठेवले असून यातून येत्या काळात शेतकऱ्यांना १२ तास वीज देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
जयसिंगपूरमधील रेल्वेक्रॉस पुलाबाबत सकारात्मक कार्यवाहीचे मुख्यमंत्र्याचे निर्देश
मुंबई, दि. ४ : जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथील रेल्वे क्रॉस पुलाबाबत परिसरातील रहिवासी क्षेत्र आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या पुलाबाबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली. बैठकीत आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, परिवहन विभागाचे सह सचिव सिद्धार्थ खरात, मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता अरोरा आदी सहभागी झाले. जयसिंगपूर शहरातून […]
पर्यावरण संवर्धनासह स्थानिकांच्या आकांक्षा लक्षात घेऊन विकासाचा समतोल साधला जाईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पालघर दि. 04 : किनारपट्टी क्षेत्र विकास आराखड्यास मान्यता दिली असून पर्यावरण संवर्धनासह स्थानिकांच्या आकांक्षा लक्षात घेऊन विकासाचा समतोल साधला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संपन्न झाला त्याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. देशाच्या आर्थिक राजधानीपासून जवळ […]