Month: November 2024
मंत्रिमंडळ निर्णय
ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती योजनेबाबत मंत्रिमंडळ उप समिती स्थापन ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा या योजनेत घ्यावयाची कामे, अंमलबजावणी व इतर निकष सुधारित करण्याबाबत मंत्री मंडळास शिफारस करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या समितीच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री तर सदस्य म्हणून वन व […]
मानिवाईज वित्तीय साक्षरता सेंटर येथे वर्धापन दिन सोहळा साजर
मुलचेरा:- भारतीय रिझर्व बँकेच्या वित्तिय समावेशन विभागांतर्गत, बँक ऑफ महाराष्ट्र संचालित क्रिसिल फाउंडेशन यांच्या सहकार्याने मुलचेरा येथे मानिवाईज वित्तीय साक्षरता सेंटर ची स्थापना करण्यात आली. १ नोव्हेंबर २०२२ ला साक्षरता सेंटर ने एक वर्ष पूर्ण करून दुसर्या वर्षात पदार्पण केले. त्या निमित्याने सेंटर ला वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संवर्ग विकास […]
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची कर्जमर्यादा १० लाखावरुन १५ लाख रुपये – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 01 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते. यामध्ये 10 लाखाच्या मर्यादेत असणाऱ्या कर्जावरील व्याज परतावा महामंडळामार्फत देण्यात येतो. या योजनेअंतर्गत कर्ज मर्यादेत वाढ करुन 15 लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्ज मर्यादा वाढविल्यामुळे लाभार्थींना कर्जाच्या हप्त्यांमध्ये सुलभता राहावी. म्हणून कर्ज परताव्याचा कालावधी सुद्धा 5 वर्षावरुन 7 वर्षापर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात […]
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एससी, एसटी, ओबीसी प्रमाणे निर्वाह भत्ता – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 01 : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या निकषानुसार एससी/एसटी/ओबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे वर्षाला 60 हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या अंतर्गत वसतीगृह, शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष […]
लता मंगेशकर या सहस्रकातील ईश्वराकडून मिळालेली मोठी देणगी – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
‘रसमयी लता’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई, दि. 1 : “सर्व भावनांचा, भाषेतील प्रत्येक शब्दांचा आशय सुरात प्रकट करणाऱ्या लता मंगेशकर या सहस्रकातील भारताला ईश्वराकडून मिळालेली मोठी देणगी आहे”, असे भावोद्गार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज काढले. विनीता तेलंग लिखित आणि हिंदुस्तान प्रकाशन अर्थात साप्ताहिक विवेकने प्रकाशित केलेल्या ‘रसमयी लता‘ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. प्रभादेवी […]
इटालीयन गुंतवणूकदारांसाठी राज्याकडून संपूर्ण सहकार्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १ : इटली आणि भारताचे संबंध हे नेहमीच सौहार्दपूर्ण राहीले आहेत. गुंतवणूकदारांना येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी राज्याकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. इंडो- इटालीयन औद्योगिक संबंधांची पाच दशके साजरे करण्यासाठी मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी इटलीचे भारतातील राजदूत विंचेझो दे लुका, इंडो […]
जूनपासून बल्लारपूर येथे सुरू होणार एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्र
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती मुंबई, दि. 1 : महिलांना शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात एसएनडीटी विद्यापीठाचा मोठा वाटा आहे. शंभर वर्षांहून अधिक काळ झालेल्या एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्र येत्या जूनपासून चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे सुरु करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याविषयी सातत्याने पाठपुरावा केला होता. येणाऱ्या शैक्षणिक वर्षांपासून […]
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांसाठी सर्व सोयी-सुविधा द्याव्यात – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई, दि. 1 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. यंदा ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते, त्यामुळे प्रशासनाच्यावतीने सर्व सोयी-सुविधा देण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर […]