मुंबई, दि. 30 : ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियान मुंबई उपनगर जिल्ह्यातील पंधरा वॉर्डमध्ये उद्या 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. प्रत्येक वॉर्डमधील स्थानिक लोकप्रतिनिधी, शासनाचे सर्व विभाग, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच नागरिकांनी या अभियानात श्रमदान करून ते यशस्वी करूया, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ हे […]
Day: November 23, 2024
छत्रपती शिवरायांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही; विधानाचा विपर्यास न करण्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आवाहन
मुंबई, दि. 30 : छत्रपती शिवरायांचे कार्य सगळ्या विश्वात अतुलनीय आहे. त्यांच्याशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. आज प्रतापगड येथे झालेल्या कार्यक्रमात मी छत्रपती शिवरायांसंदर्भात उदाहरण दिले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे सूर्य असून राज्यात त्यांच्या विचाराने प्रेरणा घेऊन अत्यंत चांगले काम करण्याचा आपला मानस आहे, असे राज्याचे कौशल्य विकास, पर्यटन आणि महिला व बालविकास […]
लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात १० हजार ४३४ पशुपालकांच्या खात्यांवर २६ कोटी रुपये जमा – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह
मुंबई, दि. 30 : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा १० हजार ४३४ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. २६.५६ कोटी रुपये जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. श्री.सिंह म्हणाले की, राज्यामध्ये 30 नोव्हेंबर २०२२ अखेर 35 जिल्ह्यांमधील एकूण 3857 संसर्गकेंद्रांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला […]
लोकराज्यचा नोव्हेंबर २०२२ चा “चला जाणूया नदीला” विशेषांक प्रकाशित
मुंबई, दि. ३० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या नोव्हेंबर २०२२ च्या “चला जाणूया नदीला” या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘लोकराज्य’ च्या या विशेषांकामध्ये राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘चला जाणूया नदीला’ या उपक्रमासंदर्भात विशेष लेखांचा समावेश करण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ नद्यांच्या परिक्रमेचा उपक्रम राज्य शासनाने लोकसहभागातून […]
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ या विषयावर उद्या मुलाखत
मुंबई, दि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची ‘माझी मुंबई,स्वच्छ मुंबई’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरुवार, दि. 1 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.00 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल. यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR ‘माझी […]
महाराष्ट्रातील दोन प्रशिक्षक आणि चार खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान
वर्ष २०२२ चे क्रीडा पुरस्कार आणि वर्ष २०२१ चे तेनजिंग नोर्गे साहस पुरस्कार प्रदान नवी दिल्ली, दि. 30 : क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या खेळाडूंना विविध श्रेणीतील राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये वर्ष 2022 चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आणि वर्ष 2021 साठीचा तेनजिंग नोर्गे साहस पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील दोन प्रशिक्षक आणि चार खेळाडूंचा यात […]
नाशिक येथील वैद्यकीय संस्थांच्या ३४८ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन
मुंबई, दि. 30 : नाशिक शहरातील लोकसंख्या विचारात घेऊन येथे वैद्यकीय महाविद्यालय आणि महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्यात आले आहे. या दोन्हींसाठी मंगळवारी शासन निर्णयान्वये 348 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. नाशिक येथे वैद्यकीय महाविद्यालय आणि महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था […]
मच्छिमार परवाना नूतनीकरणासाठी आता ‘ना हरकत प्रमाणपत्रा’ची गरज नाही; मच्छिमार सहकारी संस्थांना शासनाचा दिलासा
मुंबई, दि. 30 : राज्यातील तलाव आणि धरणांमध्ये मासेमारी करणाऱ्या आणि दि. 3 जुलै 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना यापुढे परवाना नूतनीकरण करण्याकरिता विभागाच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’ची गरज राहणार नाही, असा शासन आदेश आज राज्य शासनाने जारी केला आहे. या नवीन निर्णयामुळे राज्यातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर […]
महाराष्ट्र आणि ओंटारियो राज्य (कॅनडा) यांच्यात सामंजस्य करार; राज्यात विविध क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार
मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र आणि कॅनडा देशातील ओंटारियो या दोन राज्यांमध्ये विविध क्षेत्रातील गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. उद्योग मंत्री उदय सामंत व ओंटारियो राज्याचे (कॅनडा) आर्थिक विकास, रोजगार निर्मिती आणि व्यापार मंत्री व्हिक्टर फेडेली यांच्या स्वाक्षरीने हा सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार राज्यात माहिती तंत्रज्ञान, वित्त, मीडिया, ऑटोमोबाईल, अन्न प्रक्रिया, अंतराळ (एरोस्पेस) […]
विद्यापीठातील लैंगिक तक्रार प्रकरणातील फसवणूक रोखण्यासाठी यंत्रणा असावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई, दि. 30 : राज्यात अनेक ठिकाणी तरुणी, महिला यांच्यावर अत्याचाराच्या घटना घडतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात लैंगिक छळाची तक्रार प्रकरणाबाबत व सेफ कॅंपसबाबत अनेक सूचना व निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिले. महाविद्यालयीन व विद्यापीठातील अत्याचाराच्या घटनांवरील उपाययोजना आणि नागपूर विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्राच्या अडचणी या विषयासंदर्भात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या […]