समाजमनाची नस अचूक पकडणारा साक्षेपी लेखक आपण गमावला मुंबई, दि. 30 : आपल्या लेखनातून समाजमनाची नस अचूक पकडणारा साक्षेपी लेखक आपण गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस शोकसंदेशात म्हणतात, डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांनी विविध लेखनप्रकारांतून मराठी साहित्य […]
Day: November 23, 2024
‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ निवड समितीची पुनर्रचना
मुंबई, दि. 30: सांस्कृतिक क्षेत्रात विशेष लक्षणीय कार्य करणाऱ्या कलावंतांना ‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. या सांस्कृतिक पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या समितीमध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री हे अध्यक्ष, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव हे सदस्य तर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे सदस्य सचिव असतील. तसेच नाटक या कलाक्षेत्रासाठी सतिश पुळेकर, कंठसंगीतासाठी […]
माजी कुलगुरु प्राध्यापक नागनाथ कोतापल्ले यांच्या निधनाने अभिजात लेखणी शांत झाली – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 30 : ज्येष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तसेच मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्राध्यापक नागनाथ कोतापल्ले यांच्या निधनाने अभिजात लेखणी शांत झाली आहे, या शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. श्री. मुनगंटीवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा […]
राज्यपालांच्या हस्ते गुरुनानक यांच्या जीवनकार्यावरील पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई, दि. 30 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शीख समाजाचे संस्थापक व पहिले गुरु गुरुनानक यांच्या जीवनकार्यावरील ‘गुरुनानक देव के संवाद और समाज को मार्गदर्शन’ या पुस्तकाचे राजभवन मुंबई येथे आज प्रकाशन करण्यात आले. लेखक व क्रीडा सुविधा विकासक राजन खन्ना तसेच स्तंभलेखक व संशोधक डॉ. रतन शारदा हे या पुस्तकाचे लेखक आहेत. गुरुनानक यांच्या […]
नेदरलँड्सचे महावाणिज्य दूत बार्ट डे जाँग यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
राज्यातील गुंतवणुकीबाबत नेदरलँड उत्सुक मुंबई, दि. 30 : नेदरलँडचे महावाणिज्य दूत बार्ट डे जाँग यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उभय देशांतील व्यापार आणि महाराष्ट्रातील गुंतवणुकीबाबत चर्चा झाली. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, नेदरलँड आणि महाराष्ट्र यांचे घनिष्ठ संबंध आहेत. हे संबंध परदेशीय गुंतवणुकीत आणखी दृढ […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली
स्वतंत्र प्रतिभेचा, समाजजीवनाशी एकरूप कृतिशील साहित्यिक मुंबई, दि. ३० :- ‘समाजजीवनाशी एकरूप होऊन आपल्या लेखनातून मराठी साहित्यात मोलाची भर घालणारा स्वतंत्र प्रतिभेचा, कृतिशील साहित्यिक गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, डॉ.कोत्तापल्ले यांचा मराठीचे शिक्षक ते कुलगुरू, साहित्य संमेलनाध्यक्ष आणि […]
शाहीर पियुषी भोसले हिचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार
सातारा, दि. 30 : शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात अण्णासाहेब कल्याणी शाळेची दिव्यांग विद्यार्थीनी शाहीर पियुषी भोसले हिने सादर केलेल्या रोमहर्षक, भारदस्त पोवाड्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिचे कौतुक करून विशेष सत्कार केला. तसेच मुख्यमंत्री महोदयांनी तिला स्वतः रोख बक्षीस देऊन कौतुक केले. शाहीर पियुषी भोसले हिने शिवप्रताप दिनाचा पोवाडा सादर करुन मंत्रमुग्ध केले. पियुषीने दिव्यांगावर मात […]
गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिवप्रताप दिन सोहळा : किल्ले प्रतापगडावर छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव सातारा, दि. 30 : महाबळेश्वर येथील किल्ले प्रतापगडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवकालीन गड किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी किल्ले प्रतापगड येथील बुरुजावरील शिवशाहीचे […]