मुंबई, दि. १ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी दादर परिसरातील सर्व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येणार असल्याचे आदेश मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी जारी केले. मुंबई शहर जिल्ह्यातील निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, एफ.जी.आय. विभाग, मुंबई शहर यांच्या कार्यक्षेत्रातील दादर, शिवाजी पार्क, माहिम, धारावी, सायन, […]
Day: November 23, 2024
लोकसहभागाच्या माध्यमातून मुंबई भारतातील सर्वात सुंदर शहर बनविणार – पालकमंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. १ : मुंबईला सर्वात स्वच्छ, सुंदर आणि निरोगी शहर बनविण्याचा शासनाचा निर्धार आहे. हा निर्धार लोकसहभागाच्या माध्यमातून पूर्ण करणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानाचे उद्घाटन मंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते जी – नॉर्थ कार्यालय परिसरात करण्यात […]
‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ या विषयावर मुलाखत
मुंबई, दि. 1 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ या विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर उद्या शुक्रवारी 2 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल. ‘माझी मुंबई, […]
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी २ डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करण्याची मुभा – राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई, दि. 1 (रानिआ) : विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी आज दिली. श्री. मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर […]
औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना गती देण्यात यावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत आढावा बैठक मुंबई, दि.१ : औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेच्या (शहरी) कामांना गती देण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या (शहरी) औरंगाबाद महानगरपालिका स्तरावरील कामासंदर्भात आढावा बैठक केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते. बैठकीस […]
राज्यपालांच्या हस्ते ‘टायटन्स ऑफ फेअर बिझनेस प्रॅक्टिसेस’ या पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई, दि. 1 : ‘टायटन्स ऑफ फेअर बिझनेस प्रॅक्टिसेस’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे झाले. लेखक विकेश वालिया यांनी पुस्तकाची पहिली प्रत राज्यपालांना भेट दिली. पुस्तकाचे प्रकाशन टाईम्स ऑफ इंडिया समूहातर्फे करण्यात आले आहे. पुस्तक प्रकाशन सोहळ्याला बजाज इलेक्ट्रिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक शेखर बजाज, सीएफबीपीचे अध्यक्ष ॲड. स्वप्नील कोठारी, […]