नागपूरला ग्रामविकास विभागाचे भव्य ‘महारुद्र’ केंद्र उभारणार मुंबई, दि. 5 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम व नियोजित कामांना गती देऊन दर्जा व वेळ यांस प्राधान्य द्यावे, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. या बैठकीत, ग्रामविकासाला गती प्राप्त करुन देणारी प्रबोधिनी नागपूरला उभारण्याचा व यासह अनेक महत्त्वाचे निर्णय […]
Day: November 23, 2024
लम्पी चर्मरोग : गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पूर्ण – पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती
मुंबई, दि. 5 : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आजअखेर एकूण 144.12 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 139.42 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेल्या लसीकरणाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 100 टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे […]
महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. प्रकाश पवार यांचे व्याख्यान
मुंबई, दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. प्रकाश पवार यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. मंगळवार, दि. 6 डिसेंबर 2022 रोजी सायं 7.30 वाजता हे व्याख्यान महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल. यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या […]
‘दिलखुलास’ कार्यक्रमात महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. प्रकाश पवार यांचे व्याख्यान
मुंबई, दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. प्रकाश पवार यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. हे व्याख्यान राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर मंगळवार दि. 6 व बुधवार दि. 7 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल. भारतीय […]
सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन, डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षणास प्रवेश घेण्याचे आवाहन
मुंबई, दि. ५ : सन २०२३-२०२४ या वर्षातील १ जानेवारी २०२३ ते ३० जून २०२३ या सहा महिन्याच्या कालावधीसाठी, सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन या १२९ व्या सत्राच्या प्रशिक्षणास प्रवेश घेण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टिकोनातून, मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थीना सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानवन […]
महाराष्ट्राच्या विकासासाठी उद्योगस्नेही धोरण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 5 : सध्या अनेक कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. उद्योगांना एकाच छताखाली सर्व परवानग्या मिळण्यासाठी एक खिडकी योजना सुरू आहे. कंपन्यांना यातही काही अडचणी, समस्या येऊ नयेत म्हणून राज्यात नवीन उद्योगांकरिता उद्योगस्नेही धोरण आणले जाईल. त्याचबरोबर ‘रिअल सिंगल विंडो’द्वारे जलद परवानग्या दिल्या जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ‘रिइमेजिंग महाराष्ट्र’ […]
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे चैत्यभूमीवर मतदार जागृती दालन
मुंबई दि. 5 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने चैत्यभूमीवर मतदार जागृती दालन उभारले आहे. या दालनात मतदार यादी, मतदार नोंदणी, निवडणूक यासंबंधी माहिती इथे येणाऱ्या अनुयायांना मिळणार आहे. गेल्या वर्षभरात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्रकाशित करण्यात आलेली आणि डॉ. दीपक पवार यांनी संपादित केलेली ‘लोकशाही समजून घेताना’ आणि […]
शालेय विद्यार्थी आणि युवकांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियान – पालकमंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 05 : शालेय विद्यार्थी आणि तरुण मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी समाजातील सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी कडक उपाययोजनांची गरज असून मुंबई शहरात व्यसनाधीनतेच्या आहारी नेणाऱ्या पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करा आणि असे ड्रग रॅकेट उद्ध्वस्त करा, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. आगामी काळात […]
नौसेना दिनानिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत बिटिंग द रिट्रीट समारोह संपन्न
मुंबई, दि. 5 : भारतीय नौदलाच्या पश्चिम विभाग मुख्यालयातर्फे नौदल दिनानिमित्त रविवारी (दि.4) गेट वे ऑफ इंडिया येथे ‘बिटींग द रिट्रीट’ आणि ‘टॅटू सेरेमनी’चे आयोजन करण्यात आले. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला नौदलाच्या पश्चिम कमानचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल अजेंन्द्र बहादूर सिंह, श्रीमती चारू सिंह, नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, […]
सातबारा व मिळकत पत्रिका वर आता यूएलपीन बंधनकारक
सातबारा, मिळकत पत्रिकांवर आता ‘यूएलपीन’ बंधनकारक केंद्र शासनाच्या सूचनेला राज्याची मान्यता. 712 Utara ULPIN in Maharashtra राज्यातील सर्व सातबारा उतारे आणि मिळकत पत्रिकांवर यापुढे ‘अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक’ (यूएलपीन नंबर) देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे ही सूचना केंद्र शासनाने केली होती. महसूल व वन विभागाचे सहसचिव रमेश चव्हाण यांनी 30 नोव्हेंबर 2022 रोजी […]