गावातील गावकरी व बचत गटातील महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या मूलचेरा:- तालुक्यातील अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखले जाणाऱ्या बोलेपल्ली ग्रामपंचायत येथील समाज भवन येथे आज माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेट चे राजे अमरीशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली समस्या जाणून घेण्यासाठी गावकऱ्यांची बैठक घेण्यात आली, त्यावेळेस बोलेपल्ली, पुल्लिंगुडम, हेटाळकसा या गावातील गावकरी आणि बचत गटाच्या महिला यांच्या समस्या […]
Day: November 23, 2024
स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर
मुंबई, दि. ०६ – सन २०२१ या वर्षात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कार प्रदान करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या परीक्षण समितीच्या निकालपत्रानुसार ३५ विविध वाङ्मय प्रकारांसाठी ३३ लेखक, साहित्यिकांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण […]
वन्यजीव, पर्यावरण संरक्षण हे ईश्वरीय कार्य – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
गुजरातमधून आणलेली सिंहाची जोडी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात मुक्त मुंबई, दि. 6 : भारताचे राष्ट्रीय प्रतीक असलेला सिंह आमचा अभिमान आहे, अशोक स्तंभावर सिंह आहे, पराक्रमाचे प्रतीक सिंह आहे. जंगलाचा हा राजा राज्यातील वनांच्या सानिध्यात राहावा यासाठी पुढाकार घेतला असून सिंहांची जोडी उद्यानात सोडताना अतिशय आनंद होत असून वन्यजीव व पर्यावरण संवर्धन हे ईश्वरीय कार्य आहे, असे […]
राज्याला उद्योग क्षेत्रात अधिक आघाडीवर ठेवण्यात अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स (‘AMCHAM’) चे सहकार्य मोलाचे ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स (‘AMCHAM’) अपेक्स काॅन्क्लेव्ह मुंबई दि 6 :- महाराष्ट्र राज्य उद्योगस्नेही राज्य असून उद्योग क्षेत्रात राज्य अग्रेसर आहेच. महाराष्ट्र हे अमेरिकन उद्योगांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण आहे. या पुढील काळातही राज्याला उद्योग क्षेत्रात अधिक आघाडीवर ठेवण्यात अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स (‘AMCHAM’)चे सहकार्य मोलाची भुमिका बजावेल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जियो कन्व्हेन्शन […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांना श्रद्धांजली
सांस्कृतिक क्षेत्रातील अखंड सेवाव्रती मुंबई, दि. ६ :- ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांच्या निधनामुळे सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत अखंड सेवाव्रती काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांनी अखंड आयुष्य मराठी कला क्षेत्राला अर्पण केले. रंगभूमीच्या सेवेचे व्रतच […]
फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय
नवीन नगरपालिका नागरी विकासामध्ये सर्वोत्कृष्ट ठरेल मुंबई, दि. ६ : पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांची नवी नगरपालिका करण्याचा निर्णय आज येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ‘या नगरपालिकेच्या माध्यमातून या गावांतील नागरिकांच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच नागरिकांच्या सहभागातून ही नगरपालिका विकास कामांमध्ये एक सर्वोत्कृष्ट ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. […]
कोकणातील तरूणांना कोकणातच रोजगार उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
स्वराज्य भूमी कोकण महोत्सवाचे उद्घाटन मुंबई, दि. 6 : “कोकणातील तरूणांना कोकणातच रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी पर्यटन विकासासह विविध स्थानिक उद्योगांना चालना देऊन कोकणचा पर्यावरणपूरक शाश्वत विकास घडविण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील’’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. समृद्धी महामार्गाप्रमाणे कोकणात ग्रीनफिल्ड रस्ता करता येईल का यावर काम सुरू असून स्थानिकांनी त्यांच्या हिताचे […]
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजविलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्वे सर्वव्यापी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. ६ : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजविलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वे सर्वव्यापी आहेत, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. दादर येथील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई […]
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन
मुंबई, दि,६: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. दादर येथील चैत्यभूमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आज शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, […]
नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये भरती | NCL Recruitment 2022
नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये भरती अंतर्गत ‘‘माइनिंग सिरदार T&S ग्रुप ‘C’,सर्व्हेअर T&S ग्रुप ‘B’ (माइनिंग) पदांच्या एकूण 405 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार हा फक्त पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी+ओवरमन प्रमाणपत्र (iii) गॅस परिक्षण प्रमाणपत्र (iv) प्रथमोपचार प्रमाणपत्र, पद क्र.2: 10वी उत्तीर्ण/+सर्व्हेअर प्रमाणपत्र […]