मुंबई, दि. 05 : शालेय विद्यार्थी आणि तरुण मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी समाजातील सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी कडक उपाययोजनांची गरज असून मुंबई शहरात व्यसनाधीनतेच्या आहारी नेणाऱ्या पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करा आणि असे ड्रग रॅकेट उद्ध्वस्त करा, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. आगामी काळात […]
Month: November 2024
नौसेना दिनानिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत बिटिंग द रिट्रीट समारोह संपन्न
मुंबई, दि. 5 : भारतीय नौदलाच्या पश्चिम विभाग मुख्यालयातर्फे नौदल दिनानिमित्त रविवारी (दि.4) गेट वे ऑफ इंडिया येथे ‘बिटींग द रिट्रीट’ आणि ‘टॅटू सेरेमनी’चे आयोजन करण्यात आले. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला नौदलाच्या पश्चिम कमानचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल अजेंन्द्र बहादूर सिंह, श्रीमती चारू सिंह, नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, […]
सातबारा व मिळकत पत्रिका वर आता यूएलपीन बंधनकारक
सातबारा, मिळकत पत्रिकांवर आता ‘यूएलपीन’ बंधनकारक केंद्र शासनाच्या सूचनेला राज्याची मान्यता. 712 Utara ULPIN in Maharashtra राज्यातील सर्व सातबारा उतारे आणि मिळकत पत्रिकांवर यापुढे ‘अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक’ (यूएलपीन नंबर) देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे ही सूचना केंद्र शासनाने केली होती. महसूल व वन विभागाचे सहसचिव रमेश चव्हाण यांनी 30 नोव्हेंबर 2022 रोजी […]
मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांकडून समृद्धी महामार्गाची पाहणी
आधुनिक महाराष्ट्राची नवी भाग्यरेखा पूर्णत्वाकडे राज्यात ठिकठिकाणी उत्साहात स्वागत मुंबई, दि. 4 : ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 11 डिसेंबरला होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर ते शिर्डी असा प्रत्यक्ष प्रवास करून महामार्गाची पाहणी केली. या दौऱ्यात […]
अभिनव अभ्यासक्रमाचा कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते प्रारंभ
महिलांसाठी आता गॅस स्टेशन, पेट्रोल पंप सेवकाचे प्रशिक्षण मुंबई, दि. 4 : मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व रेवती रॉय फाऊंडेशन यांच्यामार्फत महिलांसाठी ‘गॅस स्टेशन, पेट्रोल पंप सेवक’ या अभिनव अभ्यासक्रमाचा नुकताच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यातून प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना थेट गॅस स्टेशन, पेट्रोल पंप […]
“आत्मनिर्भर भारतासाठी स्त्रीशक्ती आत्मनिर्भर होणे गरजेचे” : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मणिबेन नानावटी महिला महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न मुंबई, दि. 4 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर देशाचा अमृतकाळ सुरु झाला आहे. देशात मातृशक्तीचे पुनर्जागरण होत आहे. विद्यापीठांमधून अधिकाधिक विद्यार्थिनी सुवर्ण पदके प्राप्त करीत आहेत तसेच केंद्रिय लोकसेवा आयोगासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला उत्तीर्ण होत आहे. उज्ज्वल भारताचे स्वप्न साकार करून देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी स्त्रीशक्ती स्वत: आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे. […]
नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गातील सुविधा व कामांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी
शिर्डी, ४ डिसेंबर (उमाका वृत्तसेवा) :- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते शिर्डी पहिला टप्प्यातील ५२० किलोमीटरच्या पूर्ण झालेल्या कामांची व सुविधांची आज पाहणी केली. नागपूर येथील समृद्धी महामार्गाचा झिरो पॉईंट […]
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केली समृद्धी महामार्गाची पाहणी; औरंगाबाद व जालन्यात भव्य स्वागत
औरंगाबाद दि.4 (जिमाका) :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातून जाणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी केली. औरंगाबाद जिल्ह्यातून 54 तर जालना जिल्ह्यातून समृद्धीचा 42 किलोमीटरचा मार्ग जात आहे. या संपूर्ण मार्गावर मोटर वाहनाने प्रवास करत त्यांनी मार्गाची पाहणी केली. स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वाहन […]
राज्याच्या विकासासाठी समृद्धी महामार्ग ‘गेमचेंजर’ ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नागपूर, दि. ४ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समृद्धी महामार्गास देण्यात आले आहे. त्यांचे नाव देण्यात आलेल्या महामार्गावरून चालण्याचा विशेष आनंद आहे. राज्याच्या विकासासाठी समृद्धी महामार्ग गेमचेंजर ठरेल, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. नागपूर विमानतळाबाहेर आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबरला समृद्धी महामार्गांचे लोकार्पण होणार […]
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून समृद्धी महामार्गाची पाहणी; विदर्भात ठिकठिकाणी शिंदे, फडणवीस यांचे स्वागत
नागपूर, दि. ४ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर येथे आगमन झाले. दुपारी १२.४५ वाजता दोन्ही नेत्यांनी नागपूर ते शिर्डी या प्रवासाला सुरुवात केली. विदर्भात नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यामध्ये पाहणी दौऱ्याचे प्रचंड स्वागत झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ११ डिसेंबर रोजी हिंदुहृदयसम्राट […]