मुंबई, दि. २ : महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी धोरणाच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्यात आली असून, नव्या निर्णयामुळे विघटनशील (कंपोस्टेबल) पदार्थापासून बनविण्यात आलेले आणि एकदाच वापर होणाऱ्या स्ट्रॉ, ताट, कप, प्लेटस, ग्लासेस, काटे, चमचे, भांडे, वाडगा, कन्टेनर आदी वस्तूंच्या उत्पादनास अनुमती देण्यात आली आहे. अशी माहिती, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग सचिव प्रविण दराडे यांनी पत्रकार परिषदेत […]
Month: November 2024
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पर्यटन सर्किटची नोंदणी सर्वांसाठी खुली; पर्यटनप्रेमींनी विनामूल्य सहलीचा लाभ घ्यावा – पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन
मुंबई, दि. 2 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांविषयी माहिती देण्यासाठी, पर्यटन संचालनालयाद्वारे तयार केलेले ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यटन (टूर) सर्किट’ 3, 4, 7 आणि 8 डिसेंबर 2022, या तारखांना विनामूल्य आयोजित केले आहे. या सहलीचा पर्यटन प्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. 26 […]
महापरिनिर्वाण दिन : अनुयायांच्या सुविधेसाठी प्रशासन सज्ज
पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून व्यवस्थेचा आढावा मुंबई, दि. २ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी राज्य शासन, सामाजिक न्याय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस यंत्रणा सज्ज आहे. डॉ. बाबासाहेबांच्या अनुयायांना सर्व मूलभूत सुविधा पुरविण्यात येतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक […]
उर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार – उपमुख्यमंत्री
एनेल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर ॲन्ड नेटवर्क कंपनीचे मार्सेलो कॅस्टीलो आगुर्तो यांनी घेतली उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट मुंबई, दि. १ :- ऊर्जा क्षेत्रात जागतिक पातळीवर नामांकित कंपन्यांपैकी एक असलेल्या इटली येथील एनेल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर ॲन्ड नेटवर्क कंपनीने ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जासह इतर क्षेत्रांत महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखविले आहे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा राज्य शासन निश्चितपणे उपलब्ध […]
सॅटेलाईट तंत्रज्ञानाद्वारे राज्याचा बहुआयामी संदर्भमूल्य कोश शक्य – उपमुख्यमंत्री
मुंबई दि २- सॅटेलाईट तंत्रज्ञानाद्वारे विविध क्षेत्रांत उपयोगिता वाढविताना राज्याचा स्वत:चा असा एक बहुआयामी आणि बहुउपयोगी दर्जेदार संदर्भमूल्य असलेला कोष तयार करता येऊ शकतो, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सॅटेलाईट तंत्रज्ञानाद्वारे विविध क्षेत्रातील संनियंत्रणाच्या उपयोगितेसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यासंदर्भात सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. यावेळी मुख्य सचिव मनु कुमार […]
मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा ;राष्ट्रपतींकडून विधेयकाला मंजुरी
मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांसह, केंद्रीय गृहमंत्र्यांचे मानले आभार मुंबई, दि. २:- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास अधिनियम सुधारणा विधेयकाला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. या विधेयकाला मान्यता मिळाल्याने मुंबईतील धोकादायक व उपकर प्राप्त इमारतींच्या […]
पेण – खोपोलीरोड राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणामुळे नुकसानीचे संयुक्त सर्वेक्षण होणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना सर्वेक्षणाचे निर्देश मुंबई, दि. २ : पेण – खोपोलीरोड राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करताना बाधित झालेल्या कामार्ली येथील कुटुंबांकडून मोबदला पेण-खोपोलीरोड देण्याची मागणी होत आहे. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर संयुक्तपणे या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या. सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज […]
शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यातील पाझर तलावाच्या कामांना तात्काळ मान्यता द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २ : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील विविध गावांमध्ये जलसंधारण विभागांतर्गत प्रस्तावित कामांना तत्काळ मान्यता देऊन ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलसंधारण विभागाच्या माध्यमातून करावयाच्या कामांसंदर्भात आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. आमदार विनय कोरे यांच्यासह जलसंधारण […]
महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवरील सोयीसुविधांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
राज्याच्या विविध भागातून आलेल्या अनुयायांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला संवाद मुंबई, दि. २: महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी निवासाची, भोजनाची, वैद्यकीय आणि प्रसाधनगृहांची सुविधा पुरवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेला दिले. आज मुख्यमंत्र्यांनी चैत्यभूमी आणि शिवाजी पार्कला भेट देऊन पालिका प्रशासनाने केलेल्या सोयीसुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी राज्याच्या विविध भागातून आलेल्या अनुयायांशी […]
सैनिक कल्याण विभागाच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २ : राज्याच्या सैनिक कल्याण विभागाच्या सक्षमीकरणासाठी सकारात्मक धोरण निश्चितीची आवश्यकता आहे. त्यासाठी या विभागातील जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांच्या नियुक्तीपासून ते वेतन निश्चित, पदभरती ते विविध समित्यांच्या नियुक्त्यांसाठी समन्वयाने प्रयत्न करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. सैनिक कल्याण विभागाच्या विविध प्रश्नांबाबत आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. […]