ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

वस्त्रोद्योग धोरणातून १० लाख रोजगार निर्मिती; ३६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. ५ : “वस्त्रोद्योगामध्ये भारताने पूर्वीपासूनच आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. पारंपरिक कापड निर्मितीपासून ते तांत्रिक वस्त्रोद्योगाकडे वाटचाल सुरु असून या क्षेत्रात रोजगार निर्मितीला मोठी संधी उपलब्ध आहे. राज्याच्या प्रस्तावित नवीन वस्त्रोद्योग धोरणात १० लाख रोजगार निर्मिती आणि ३६ हजार कोटी रुपयांची गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे”, अशी माहिती […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

गुजरातमधून आणलेले सिंह उद्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात सोडणार

मुंबई, दि. 5 : गुजरातमधून आणलेली सिंहांची जोडी उद्या मंगळवारी 6 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सोडण्यात येणार आहेत.             ही सिंहांची जोडी काही दिवसांपूर्वी गुजरातेतील सक्करबाग प्राणी संग्रहालयातून मुंबईत दाखल झाली आहे. हे दोन्ही सिंह प्रत्येकी दोन वर्षे वयाचे आहेत. मुंबईतील वातावरणाशी परिचित होण्यासाठी काही काळ जाऊ देण्यात आला […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘गोष्ट एका पैठणीची’ हृदयापर्यंत पोहोचणारा सिनेमा – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी ‘गोष्ट एका पैठणीची‘ चित्रपटाच्या  विशेष शोचे आयोजन मुंबई, दि.५:  साध्या सरळ गोष्टीतून मनाचे सुख नेमके काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. आपले सुख, हास्य कसे मिळवता येईल हाच या सिनेमाचा गाभा असल्याने हा सिनेमा आपल्या हृदयापर्यंत पोहोचतो असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

अमृत महोत्सवी वर्षात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना गती द्यावी – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपूरला ग्रामविकास विभागाचे भव्य ‘महारुद्र’ केंद्र उभारणार मुंबई, दि. 5 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम व  नियोजित कामांना गती देऊन दर्जा व वेळ यांस प्राधान्य द्यावे, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. या बैठकीत, ग्रामविकासाला गती प्राप्त करुन देणारी प्रबोधिनी नागपूरला  उभारण्याचा  व यासह  अनेक महत्त्वाचे निर्णय […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

लम्पी चर्मरोग : गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पूर्ण – पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती

मुंबई, दि. 5 : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आजअखेर एकूण 144.12 लक्ष लस  उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 139.42 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेल्या लसीकरणाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 100 टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. प्रकाश पवार यांचे व्याख्यान

मुंबई, दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. प्रकाश पवार यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. मंगळवार, दि. 6 डिसेंबर 2022 रोजी सायं 7.30 वाजता हे व्याख्यान महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल. यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘दिलखुलास’ कार्यक्रमात महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. प्रकाश पवार यांचे व्याख्यान

मुंबई, दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. प्रकाश पवार यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. हे व्याख्यान राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर मंगळवार दि. 6 व बुधवार दि. 7 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.25  ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल. भारतीय […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन, डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षणास प्रवेश घेण्याचे आवाहन

मुंबई, दि. ५ : सन २०२३-२०२४ या  वर्षातील १ जानेवारी २०२३ ते ३० जून २०२३ या सहा महिन्याच्या कालावधीसाठी, सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन या १२९ व्या सत्राच्या प्रशिक्षणास प्रवेश घेण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टिकोनातून, मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थीना सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानवन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महाराष्ट्राच्या विकासासाठी उद्योगस्नेही धोरण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 5 : सध्या अनेक कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. उद्योगांना एकाच छताखाली सर्व परवानग्या मिळण्यासाठी एक खिडकी योजना सुरू आहे. कंपन्यांना यातही काही अडचणी, समस्या येऊ नयेत म्हणून राज्यात नवीन उद्योगांकरिता उद्योगस्नेही धोरण आणले जाईल. त्याचबरोबर ‘रिअल सिंगल विंडो’द्वारे  जलद परवानग्या दिल्या जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ‘रिइमेजिंग महाराष्ट्र’ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे चैत्यभूमीवर मतदार जागृती दालन

मुंबई दि. 5 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने चैत्यभूमीवर मतदार जागृती दालन उभारले आहे. या दालनात मतदार यादी, मतदार नोंदणी, निवडणूक यासंबंधी माहिती इथे येणाऱ्या अनुयायांना मिळणार आहे. गेल्या वर्षभरात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्रकाशित करण्यात आलेली आणि डॉ. दीपक पवार यांनी संपादित केलेली ‘लोकशाही समजून घेताना’ आणि […]