[dflip id=”6434″][/dflip]
Month: November 2024
मुंबईत ३ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी
मुंबई, दि. ३० : शांतता व सार्वजनिक सुव्यवस्था भंग होऊ नये, मानवी जीवन व मालमत्तेचे गंभीर नुकसान टाळण्यासाठी पाच किंवा अधिक व्यक्तींच्या हालचाली आणि बेकायदेशीर एकत्र येण्यावर मुंबई क्षेत्रात ३ फेब्रुवारीपर्यंत बंदी असल्याची माहिती पोलीस उप-आयुक्त (अभियान) विशाल ठाकूर यांनी दिली आहे. या आदेशान्वये पाच किंवा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलनास प्रतिबंध, कोणत्याही व्यक्तीची कोणतीही मिरवणूक […]
डीएड, बीएड उमेदवारांसाठी अखेर मोठी घोषणा! TAIT भरती
पाच वर्षापासून रखडलेली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता (TAIT Exam) चाचणीची प्रतीक्षा आता संपली आहे. 2017 नंतर आतापर्यंत 5 वर्षे उमेदवार प्रतिक्षेत असताना आता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेची अखेर घोषणा झाली आहे. राज्य परीक्षा परिषदेकडून तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील तीन लाखाहून अधिक डीएड-बीएड धारक आणि 54 हजार पात्र शिक्षक या अभियोग्यता चाचणीसाठी […]
उद्योग विभागाच्यावतीने प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावे – उद्योगमंत्री उदय सामंत
रत्नागिरी, दि. 30 : राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून राज्य शासनाच्या उद्योग विभागाने पुढाकार घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा घेण्याचे निश्चित केले आहे. रोजगार मेळाव्याचा प्रारंभ १२ फेब्रुवारीपासून रत्नागिरी जिल्ह्यातून होणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. रत्नागिरी येथील शिर्के हायस्कूलमध्ये पहिला रोजगार मेळावा होणार आहे. या मेळाव्यात […]
महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरे पारितोषिक मिळाल्याबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले अभिनंदन
मुंबई, दि. ३० : प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर झालेल्या पथ संचलनात ‘महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ संकल्पनेवर आधारित चित्ररथ सहभागी झाला होता. संरक्षण मंत्रालयाच्यावतीने महाराष्ट्राच्या या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथाचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक जाहिर झाले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा पुरस्कार महाराष्ट्रातील समस्त महिला शक्तीला समर्पित केला आहे. यावर्षी सहभागी झालेल्या चित्ररथामध्ये उत्तराखंडच्या चित्ररथाला पहिल्या […]
महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर
‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ चित्ररथ प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर झळकला नवी दिल्ली, दि. ३० : 74 व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावरील पथसंचलनात महारष्ट्राच्यावतीने सादर करण्यात आलेल्या ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ या द्वितीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार जाहीर आज झाला आहे. उत्तराखंड राज्याला प्रथम क्रमांक, तर उत्तर प्रदेश राज्याला तिसरा क्रमांक जाहीर झाला. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्यावतीने उत्कृष्ट चित्ररथाची निवड करण्यात आली असून मंगळवारी दुपारी निवड […]
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
मुंबई, दि. ३० : महाराष्ट्र राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच मतदारसंघात आज शांततेते मतदान झाले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक विभागात ४९.२८ टक्के, अमरावती विभागात ४९.६७ टक्के, औरंगाबाद विभागात ८६ टक्के, नागपूर […]
राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समित्या जाहीर
मुंबई, दि. 30 : मुंबई विद्यापीठ तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी स्वतंत्र निवड समित्या गठित केल्या आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डी पी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठाची कुलगुरु निवड समिती गठित करण्यात आली आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे […]
विद्यापीठाने नाविन्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
डॉ. होमी भाभा विद्यापीठाच्या नवीन कार्यालयाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन मुंबई, दि. 30 : डॉ. होमी भाभा यांनी विज्ञानाच्या प्रगतीला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. अणुशक्ती या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. या महान व्यक्तीचे नाव या विद्यापीठाला दिले. या नावाप्रमाणे विद्यापीठाने नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून उत्कृष्ट विद्यापीठ म्हणून लौकिक होईल अशी शैक्षणिक वाटचाल करावी, असे […]
सर्वांनी एकत्रितपणे केंद्र शासनाकडे राज्याच्या प्रलंबित प्रस्तावांबाबत पाठपुरावा करावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदारांना आवाहन
महाराष्ट्रातील संसद सदस्यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक खासदार हे राज्याच्या विकासासाठीचे देशाच्या सर्वोच्च सभागृहातील महाराष्ट्राचा बुलंद आवाज मुंबई, दि. ३० : संसद सदस्य हे राज्याच्या विकासासाठी झटणारे आणि त्यासाठी देशाच्या सर्वोच्च सभागृहातील महाराष्ट्राचा आवाज आहेत. हा आवाज जितका बुलंद तेवढ्या विकासाच्या योजना, निधी राज्यात येणार त्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत पाठपुरावा […]