डॉ. विश्वास मेहेंदळे यांना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची श्रद्धांजली मुंबई, दि. 9 : दूरदर्शनचे पहिले वृत्त निवेदक, पुणे तरूण भारतचे माजी संपादक, सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन चे संस्थापक, राज्याचे माजी सांस्कृतिक कार्य संचालक डॉ.विश्वास मेहेंदळे यांच्या निधनाने एक जाणता पत्रकार आणि अभ्यासू लेखक आपण गमावला आहे, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार […]
Day: November 23, 2024
राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबईतील केरळ ख्रिश्चन कौन्सिलचा ६५ वा वार्षिकोत्सव साजरा
मुंबई, दि.९: केरळमधील कालडी येथे जन्मलेल्या आद्य शंकराचार्यांनी देशातील चार भागात बद्रीनाथ, रामेश्वरम, जगन्नाथ पुरी व द्वारिकापुरी येथे धर्मपीठे निर्माण करून देशाची एकात्मता अखंड राखली. त्यामुळे भारत देश एकसंध ठेवण्यात केरळचे योगदान फार मोठे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले. राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. ८) केरळ ख्रिश्चन कौन्सिल, […]
पूर्वीच्या कामांचा दर्जा तपासून नवी कामे द्या – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंधारण महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक संपन्न मुंबई, दि. ९ : जलसंधारणाची विविध कामे कंत्राटदारांना देताना त्यांनी केलेल्या पूर्वीच्या कामांचा दर्जा तपासून मगच त्यांना नवीन कामे देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. दरम्यान, जलसंधारण महामंडळाकडील कंत्राटदार नोंदणीची जुनी पद्धत तात्काळ बदलून नवी पारदर्शक, खुली प्रक्रिया राबवून निकष पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांची नोंदणी […]
बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा आढावा मुंबई, दि. ९: वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. बीडीडी चाळींच्या कामांना गती देतानाच बांधकाम क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुणवत्तापूर्ण काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. मंत्रालयात झालेल्या या […]
लोकगीतांतून लोकशाहीचा जागर २०२२ स्पर्धेचा निकाल जाहीर
मुंबई, दि. 10 : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर – 2022’ या स्पर्धेचा निकाल राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घोषित केला आहे. लोकगीतांचा पारंपरिक गोडवा आणि समाजाला आवाहन करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे दिनांक 26 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत -एकल गटांतर्गत स्नेहा मेश्राम (पुणे) यांना प्रथम प्रिया माकोडे (यवतमाळ) यांना द्वितीय पारितोषिक, बाळू बनसोडे (सोलापूर) यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. तसेच, समूहांतर्गत […]
युवा आयुर्वेद डॉक्टरांनी आधुनिक आजारांवर ‘रामबाण’ उपाय शोधावे’ – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
पद्मभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा, प्राध्यापक वैद्य राकेश शर्मा यांचा ‘आयुर्वेद शिरोमणी’ पुरस्काराने गौरव मुंबई, दि. १० : पूर्वीच्या काळात भारतातील आयुर्वेद वैद्यांचे नाडीज्ञान खूप प्रगत होते. आयुर्वेद डॉक्टरांच्या नव्या पिढीने देखील प्राचीन नाडी ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक वनस्पतीच्या मुळांमध्ये काही ना काही औषधी गुणधर्म असतात. अशा औषधी वनस्पतींवर संशोधन करून संशोधकांनी नवीन मापदंडांच्या आधारे आधुनिक आजारांवर […]
सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
२० ते २६ फेब्रुवारी दरम्यान कोल्हापुरात लोकोत्सव, नियोजनाबाबत आढावा बैठक मुंबई, दि. १० :- ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवातून पर्यावरण रक्षणाच्या चळवळीचा प्रारंभ होईल. या लोकोत्सवाच्या नियोजनात कुठलीही कमतरता राहणार नाही. यात शासनाचे विविध विभाग सहभागी होतील. लोकोत्सव यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य राहील,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरीमठ येथे होणाऱ्या […]