मुंबई, दि. १६ : विविध देशांचे मुंबईतील राजदूत, वाणिज्य दूत तसेच मानद राजदूत यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या मुंबई दूतावासाच्या प्रमुख व डीन ऑफ काॅन्सुलर कोर अँड्रिया कून तसेच कॉन्सुलर कोर संघटनेचे उपप्रमुख विजय कलंत्री यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या या शिष्टमंडळात ३५ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सध्याचे युग हे […]
Day: November 23, 2024
सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप्सना प्रोत्साहन, शाश्वत व्यवसायासाठी राज्यात आता महाराष्ट्र स्टार्टअप अॅक्सेलेरेशन उपक्रम
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते राष्ट्रीय स्टार्टअप दिनी उपक्रमाचा प्रारंभ मुंबई, दि. १६ : स्टार्टअप्सना शाश्वत व्यवसाय तयार करण्यात मदत करणे, सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप संस्थापकांना व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने मदत करणे अशा विविध उद्दीष्टांच्या अनुषंगाने आज राष्ट्रीय स्टार्टअप दिनी राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र स्टार्टअप अॅक्सेलेरेशन उपक्रमाचा’ प्रारंभ करण्यात आला. मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास […]
डिजिटल बालवाडीच्या माध्यमातून बालकांना मिळणार दर्जेदार शिक्षण – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबईत डिजिटल बालवाडीचे उद्घाटन मुंबई, दि. १६ : डिजिटल बालवाडीच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांना कलाभिमुख आणि दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदतच होणार आहे. भव्यता फाऊंडेशनने अंगणवाडी दत्तक धोरणांतर्गत अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत. या माध्यमातून अंगणवाड्यामध्येही दर्जेदार सुविधा मिळतील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. मुंबई येथील कवडे मठ महापालिका शाळा, बाणगंगा, वाळकेश्वर येथे आज डिजिटल बालवाडीच्या उद्घाटन कार्यक्रमात […]
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३० जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित
मुंबई, दि. १६ : राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार/ जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) ,शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत त्यासाठी […]
ध्वजदिन निधी संकलनासाठी सढळ हाताने मदत करण्याचे नागरिकांना आवाहन
मुंबई, दि. १६ : माजी सैनिकांच्या कल्याणासाठी असलेल्या ध्वजदिन निधी संकलनासाठी सन २०२२- २३ या वर्षाकरीता ३६ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी संकलनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून नागरिकांनी या निधीस सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव ल. गो. ढोके यांनी केले आहे. माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी संपूर्ण देशात ७ डिसेंबर हा दिवस ‘ध्वज दिन’ म्हणून […]
पतंग उत्सवात नायलॉन मांजावर १० फेब्रुवारीपर्यंत बंदी
मुंबई, दि. 16 : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात प्लॅस्टिकपासून बनविलेल्या नायलॉन मांजा किंवा अशा कोणत्याही कृत्रिम पदार्थांच्या वापराला, विक्रीला आणि साठवणुकीवर 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत पतंग उत्सवाच्या दरम्यान बंदी घालण्यात येत असल्याचे आदेश बृहन्मुंबईचे पोलीस उप आयुक्त विशाल ठाकूर यांनी काढले आहे. दरवर्षी पतंग उडवण्याच्या उत्सवात प्लॅस्टिक किंवा तत्सम सिंथेटिक घटकाद्वारे तयार केलेल्या नायलॉन मांजामुळे माणसांना […]
जी२० बैठक; परदेशी पाहुण्यांनी धरला ढोल-लेझीमवर ठेका
पुणे, दि.१६ : ‘जी-२०’ बैठकीच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सर्व जी-२० प्रतिनिधींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाच्या अंतिम टप्प्यावर ढोल-लेझीमच्या तालावर परदेशी पाहुण्यांनी ठेका धरला. ढोल, लेझीम, टाळ हाती घेत महाराष्ट्राच्या संस्कृतीला दाद दिली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक घडामोडी या विभागाचे संयुक्त सचिव सॉलोमन अरोकिराज, […]
दावोस मध्ये पहिल्याच दिवशी राज्यात ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक; सुमारे १० हजार प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार संपन्न दावोस दि. १६ : स्वित्झर्लंड येथील दावोस’मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ४५९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली. श्री. सामंत म्हणाले, आज दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे […]
केंद्र शासनाच्या सागर परिक्रमा अभियानाला महाराष्ट्राचे सर्वतोपरी सहकार्य – मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची केंद्रीय मंत्र्यांना ग्वाही
किसान क्रेडीट कार्ड, मासेमारांसाठी पायाभूत विकास, जुन्या जेट्टींचे निराकरण, अशा महत्वपूर्ण विषयांवर चर्चा नवी दिल्ली, दि. १६ : महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० किलोमीटर सागरी किनाऱ्याची परिक्रमा करून येथील मच्छिमारांशी थेट संपर्क करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्राच्या सागर परिक्रमा अभियानात महाराष्ट्र सर्वतोपरी सहकार्य करेल आणि सहभागी होईल, अशी ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरूषोत्तम […]