ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana Maharashtra: मित्रांनो, शेतकर्‍यांसाठी संजीवनी ठरलेली “गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” योजना पुन्हा एकदा सुरू करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला असून, “गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” योजनेची (Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana Maharashtra) सविस्तर माहिती आपण आजच्या ह्या लेखात जाणून घेणार आहोत. “गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” योजना (Galmukt […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त १८ जानेवारीला ‘दिलखुलास’ कार्यक्रमात कवी, लेखक प्रशांत डिंगणकर यांचे काव्य सादरीकरण

मुंबई, दि. १७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कवी व लेखक प्रशांत डिंगणकर यांचे काव्य सादरीकरण प्रसारित होणार आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर बुधवार दि. १८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत हा कार्यक्रम प्रसारित होईल. राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत मराठी भाषेचा प्रचार व प्रसार होण्यासाठी राज्यात १४ ते २८ जानेवारी २०२३ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुंबई उपनगरसाठी ५१५ कोटी रूपयांचा प्रारुप आराखडा – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. १७ : मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता ५१५.८६ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे, असे मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. चेतना कॉलेज, बांद्रा पूर्व येथे नियोजन समिती बैठक पार पडली या बैठकीत मुंबई उपनगरचे पालकमंत्री श्री. लोढा बोलत होते. मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुंबई उपनगर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

कुस्ती खेळाच्या विकासासाठी जपानच्या वाकायामा राज्यासमवेत सामंजस्य करार करणार – क्रीडा मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि.१७ : राज्यातील कुस्तीपट्टूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑलिम्पिक सारख्या विविध स्पर्धा, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून पदकांची संख्या वाढविण्यासाठी कुस्ती या खेळासंबंधी तंत्रज्ञान आदान-प्रदान करण्याबाबत जपानमधील वाकायामा स्टेट व महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. मंत्री श्री. महाजन यांचे शासकीय निवासस्थान सेवासदन येथे जपानच्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

चंद्रपूर येथील कोल गॅसीफिकेशन प्रकल्पासाठी अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्युशनची २० हजार कोटींची गुंतवणूक

दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार १५ हजार रोजगार निर्मिती होणार दावोस दि. १७: महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध उद्योगांशी सामंजस्य करार करण्यात येत आहेत. त्यातील एक महत्वाचा सामंजस्य करार आज दावोस येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. चंद्रपूर येथील भद्रावती येथे २० हजार कोटी रुपये […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

लक्झमबर्गचे पंतप्रधान, राजपुत्र यांची महाराष्ट्र दालनाला भेट ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत चर्चा

दावोस दि. १७ : लक्झमबर्गचे पंतप्रधान झेव्ह‍िएर बेटेल  (Xavier Bettle)  आणि राजपुत्र गुलिएम जेन जोसेफ ( Guillaume Jean Joseph)  यांनी आज महाराष्ट्र पॅव्ह‍िलियनला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले तसेच त्यांच्यात चर्चाही झाली. महाराष्ट्र पॅव्ह‍िलियनमध्ये महाराष्ट्राच्या विकासाचे छायाचित्र व प्रदर्शन सुरु आहे, तेही त्यांनी आवर्जून पाहिले आणि झपाट्याने बदलत्या मुंबईविषयीची माहिती जाणून घेतली. सिंगापूरचे मंत्री […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जी-२० बैठकस्थळी असलेल्या प्रदर्शनाला दिली भेट

पुणे दि. १७: जी-२० बैठकीनिमित्त हॉटेल जे डब्ल्यू मेरिएट येथे आयोजित प्रदर्शनाला राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांनी प्रदर्शनातील विविध दालनांना भेट देऊन माहिती घेतली. विभागीय आयुक्त सौरभ राव, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस सहआयुक्त संदिप […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

चंद्रपूर येथे मत्स्यपालन प्रादेशिक संशोधन केंद्र उभारावे – मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

नवी दिल्ली, 17 : महाराष्ट्रात गोड्या पाण्यातील मासेमारी मोठ्या प्रमाणात होते. त्यातही विदर्भात हे प्रमाण अधिक आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथे मत्स्यपालन प्रादेशिक संशोधन केंद्र उभारावे, अशी मागणी महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री श्री रूपाला यांच्या अध्यक्षतेखाली सागर परिक्रमा योजनेची आढावा बैठक सोमवारी घेण्यात आली. त्या बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

पर्यावरण संवर्धन अभियानाला जनचळवळीचे स्वरूप यावे – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

‘रिझिलन्स अँड सस्टेनेबल समिट : व्हीजन २०४७’ शिखर संमेलन नवी दिल्ली, दि. १७ : मानवी विकासाच्या प्रक्रियेत पर्यावरणावर प्रतिकुल परिणाम होत आहे. त्यामुळे ऋतुचक्र बिघडले असून पर्यावरणात बदल होत आहेत. एकविसाच्या शतकात ही परिस्थिती बिकट होत चालली आहे. ‘रिझिलन्स अँड सस्टेनेबल समिट : व्हीजन २०४७’ मध्ये जे विचारमंथन होत आहे, ते प्रत्यक्ष स्वरुपात देशाच्या कानाकोपऱ्यात जनचळवळीच्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

वस्तू व सेवाकर चोरी प्रकरणी एकाला अटक

मुंबई, दि. १७ :- बनावट देयक देणाऱ्या करदात्यांसंदर्भात महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाकडून विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. मेसर्स हीर ट्रेडर्सच्या मालकाने बनावट कागदपत्रे वापरून फसव्या पद्धतीने नोंदणी करुन १० कोटींची बनावट वजावट (इनपुट टॅक्स क्रेडिट) मिळवली, तसेच रू. ८ कोटीची बनावट विक्री देयके दिली असल्याचे आढळून आले. या १८ कोटींच्या करचोरी प्रकरणी संबंधित व्यापाऱ्यास […]