मुंबई, दि. 18 : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत सैन्यातील 16 प्रकारच्या शौर्यपदक अथवा सेवापदक धारकांना शासकीय अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार शौर्यपदक अथवा सेवापदक प्राप्त करणाऱ्या सैन्यातील जवानांना अनुदान देण्यात येते. या योजनेंतर्गत परम विशिष्ट सेवेसाठी शौर्यपदक विजेते नागपूर येथील मेजर प्रतर्दन गोपाळ साकलकर यांना शासनाने 6 लाख रूपये अनुदान मंजूर केले […]
Day: November 23, 2024
‘मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या’अंतर्गत २३ ते २५ जानेवारी दरम्यान ग्रंथप्रदर्शन
मुंबई, दि. 18 : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत 23 ते 25 जानेवारी या कालावधीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असल्याचे मराठी भाषा विभागामार्फत कळविण्यात आले आहे. ग्रंथप्रदर्शनासाठी शासकीय प्रकाशनाबरोबरच खासगी प्रकाशकांनाही […]
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची उद्या मुलाखत
मुंबई, दि. १८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरुवार, दि. १९ जानेवारी २०२३ रोजी सायं ७.३० वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल. यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कराड नगपरिषदेचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान झाला […]
प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठी शासन प्रयत्न करणार – उद्योग मंत्री उदय सामंत
दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत १ लाख ४० हजार कोटींचे गुंतवणूक करार मुंबई, दि. १८ :- दावोस येथील परिषदेत महाराष्ट्र शासनाने जगभरातील विविध कंपन्यांसोबत सुमारे १ लाख ४० हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले आहेत. या माध्यमातून राज्यात एक लाख रोजगार निर्माण होतील. नव उद्योगांना ३० दिवसांत विविध परवानग्या मिळण्यासाठी तातडीने नवीन कायद्याअंतर्गत धोरण तयार […]
प्रबोधनपर मराठी चित्रपटाच्या निर्मितीसाठी अनुदानाची रक्कम एक कोटी करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई दि. १८ : महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रभावी कार्यातून समाज घडविणाऱ्या महान व्यक्तींच्या जीवनावर तसेच सामाजिक विषयावर आधारित मराठी चित्रपट निर्मितीस सहायक अनुदान पन्नास लाखावरून एक कोटी रूपये करण्याचा निर्णय आज सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केला. महान व्यक्ती आणि सामाजिक विषयांवरील चित्रपटांना अनुदान देण्यासंदर्भात आज मंत्रालयात झालेल्या सांस्कृतिक विभागाच्या […]
राज्यात काजू बोंडांपासून प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी उत्पादकांना सहकार्य करणार – मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. १८ : कोकणात काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. काजू बोंडापासून उपउत्पादन तसेच वाईन तयार करण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे काजू बोंडांची विक्री इतर राज्यात शेतकऱ्यांना करावी लागते. आपल्याच राज्यात यावर प्रक्रिया केल्यास शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. यासाठी उत्पादकांना सहकार्य करणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. आज मंत्रालयात मंत्री श्री. […]
विधानसभेच्या कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; २७ फेब्रुवारी रोजी मतदान
मुंबई, दि. १८ : भारत निवडणूक आयोगाने २१५- कसबा पेठ व २०५- चिंचवड (जि. पुणे) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे, अशी माहिती अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे. आमदार मुक्ता शैलेश टिळक यांच्या निधनामुळे कसबा पेठची, तर आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा […]
दिवाणी न्यायाधीश, न्यायदंडाधिकारी पदाच्या मुलाखतीनंतर पाच तासांत उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा- २०२१ या परीक्षेतून अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आयोगाच्या मुख्य कार्यालयात दिनांक ०९ ते १७ जानेवारी, २०२३ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. या मुलाखती पार पडल्यानंतर त्याच दिवशी अवघ्या ५ तासांच्या आत उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी तसेच तात्पुरती शिफारस […]