ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

कर्तव्यपथावरील संचलनासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या १४ विद्यार्थ्यांचा सराव

नवी दिल्ली, दि. १९  :  प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर सध्या राजधानीत सुरु आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेचे १४ आणि गोव्यातील २ असे १६ विद्यार्थी – विद्यार्थीनी सराव करीत आहेत. ७४ व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेचे सराव शिबिर येथील इंटरनॅशनल […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘दिलखुलास’ कार्यक्रमात नगर रचना संचालक प्रतिभा भदाणे यांची दि. २०, २१ व २३ जानेवारी रोजी मुलाखत

मुंबई, दि. १९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात नगर विकासच्या सहसचिव तथा संचालक, नगररचना प्रतिभा भदाणे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शुक्रवार दि. २०, शनिवार दि. २१ व सोमवार दि. २३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

एम.फील.अध्यापकांना ‘कॅस’चे लाभ देण्याबाबत शासन सकारात्मक – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. १९ :  दि. ११ जुलै २००९ पर्यंत सेवेत असताना एम. फिल. केलेल्या सर्व अध्यापकांना ‘कॅस’चे लाभ देण्यासंबंधी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे मार्गदर्शन  मागवून अशा सर्व अध्यापकांना लाभ देण्यात यावेत, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. एम. फील. अर्हता धारक अध्यापकांना ‘कॅस’चे लाभ लागू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य एम. फिल. पात्रताधारक प्राध्यापक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

दहिसर कांदळवन उद्यानाचा रस्ता सहा महिन्यात करावा – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. १९ : कांदळवनाची उपयुक्तता सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी त्यासोबतच कांदळवनाचा अनुभव घेता यावा यासाठी दहिसर येथील कांदळवन परिसरात ‘कांदळवन उद्यान’ उभे राहणार आहे. या उद्यानाला सार्वजनिक बांधकाम विभागाची मान्यता मिळाली असून उद्यानात पोहोचणारा रस्ता सहा महिन्यांत करण्याच्या सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे कांदळवन उद्यानाबाबत आयोजित बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

कर्नाळा पक्षी अभयारण्य निसर्ग पर्यटनाचा परिपूर्ण विकास आराखडा सादर करावा – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. १९ : कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तेथील पर्यटन सुविधांच्या बळकटीकरणासाठी वन विभागाने निसर्ग पर्यटनाचा परिपूर्ण विकास आराखडा सादर करावा, अशा सूचना वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. कर्नाळा पक्षी अभयारण्य निसर्ग पर्यटनाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आमदार महेश […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

नाटकांच्या माध्यमातून मिळते आनंदाची अनुभूती – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

शिवाजी नाट्य मंदिर येथे ‘शूरा मी वंदिले’ संगीतमय कार्यक्रम मुंबई, दि. १९ : सध्याचे युग हे धनाचे नसून आनंदी मनाचे आहे. संयुक्त राष्ट्र ही आता राष्ट्र किती धनवान आहे, हे बघत नसून किती आनंदी आहे हे बघते. त्यामुळे राष्ट्रांचा ‘हॅपिनेस इंडेक्स ‘ तयार करण्यात आला आहे. नाटक बघून मानव आपले दुःख विसरतो व त्याला आनंदाची […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुंबईचा सर्वांगीण विकास ही आमची सर्वोच्च प्राथमिकता – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मुंबई, दि. १९ : मुंबईतील विविध विकास कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य मुंबईकरांना विकासाच्या दिशेने नेण्याचा आमचा संकल्प आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून त्याला बळ दिले जात आहे. आधुनिक आणि विकसित मुंबई बनवण्यास शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे, आगामी काळात मुंबईचा कायापालट झालेला आपल्याला दिसेल, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

विद्यार्थांनी भयमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘एक्झाम वॉरियर्स’ पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन मुंबई, दि. १९ : ‘प्रत्येक विद्यार्थ्याने आपला अभ्यास भयमुक्त वातावरणात केला पाहिजे, हाच संदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लिखित ‘एक्झाम वारियर्स’ या पुस्तकातून मिळतो’, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले. नॅशनल बुक ट्रस्टतर्फे प्रधानमंत्री श्री. मोदी लिखित ‘एक्झाम वॉरियर्स’ पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन, स्वागत

मुंबई, दि. १९ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज एक दिवसाच्या भेटीसाठी मुंबई येथे आगमन झाले. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मेट्रो मार्गिका २ अ  (दहिसर पूर्व ते डी एन नगर) व मेट्रो मार्गिका ७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) चे उद्घाटन करण्यात येणार […]