गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

मुलचेरा तालुक्यातील कोपरली येथे ‘हात से हात जोडो’ अभियानाची बैठक संपन्न

काँग्रेसची विचारधारा शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा-जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचे आवाहन मुलचेरा- काँग्रेस पक्षाची विचारधारा ही सर्व सामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना विकासाचा केंद्र बिंदू मानत वाटचालीची व समाजात सद्भावना कायम ठेवण्याची आहे. मात्र सध्याचे सत्ताधारी जाती-धर्मात तेड निर्माण करीत सत्ता उपभोगत आहेत. सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्याची बेरोजगारांची समस्या मार्गी लागण्यासाठी काँग्रेसची विचारधारा जिवंत असणे गरजेचे आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

बाळासाहेबांची अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण, विचार, वारसा घेऊन आमची वाटचाल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधान मंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण मुंबई, दि.२३ : स्व. बाळासाहेब ठाकरे हे हिमालया एवढे उत्तुंग व्यक्तिमत्व होते. त्यांच्या विचारातून अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ आणि ऊर्जा सर्वसामान्यांना मिळाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठी माणसाच्या एकजुटीसाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांची शिकवण, विचार आणि ऐंशी टक्के समाजकारणाचा वारसा घेऊन पुढे जात आहोत, असे प्रतिपादन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आरोग्य रत्न पुरस्कारांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण मुंबई दि. २३ : पायाभूत सुविधा आणि आवश्यक मनुष्यबळ देऊन राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी शासनाचे प्राधान्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात हा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

कोकण रेल्वे परिसरातील ३७ स्थानकांचे होणार सुशोभीकरण

उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार : लाखो प्रवाशांना मिळणार दिलासा मुंबई, दि.२३ : कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत येणाऱ्या राज्यातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदूरे रेल्वेस्थानकापर्यंत एकूण ३७ रेल्वेस्थानके आहेत. ही रेल्वे स्थानके मुख्य मार्गापर्यंत जोडणाऱ्या पोहोच मार्गांची देखभाल व दुरुस्तीची कामे लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यामुळे कोकण रेल्वेने […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

ग्रामीण भागातील तरूणांना मिळणार रोजगारासह कौशल्य प्रशिक्षण

राज्य शासन आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार मुंबई, दि. २३ : राज्याच्या ग्रामीण भागातील अत्यल्प उत्पन्न असलेल्या तरूण-तरुणींना रोजगारासह कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शासन आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला. मंत्रालयात झालेल्या या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुंबईत २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन सोहळा – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

सोहळ्याचा शुभारंभ विद्यार्थ्यांच्या लोकशाही दिंडीने होणार मुंबई, दि. २३ : यंदाचा राज्यस्तरीय ‘राष्ट्रीय मतदार दिन’ मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ आणि जिल्हा निवडणूक कार्यालय, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

ई-गव्हर्नन्स क्षेत्रातील महाराष्ट्राच्या बेस्ट प्रॅक्टिसेस सर्वोत्तम

ई -रजिस्ट्रेशन प्रणाली या महत्वपूर्ण उपक्रमाविषयी सविस्तर सादरीकरण मुंबई, दि. २३ : महाराष्ट्र शासनाच्या सध्या सुरु असलेल्या महाराष्ट्र स्थलांतर प्रणाली, रस्ता गुणवत्तेसाठी कृत्रिम बुद्धिमतेचा वापर, वेध अप, ई रजिस्ट्रेशन प्रणाली या महत्वपूर्ण उपक्रमाविषयी आज झालेल्या विभागीय ई गव्हर्नस परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली. या सत्राच्या अध्यक्षस्थानी यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम होते. महाराष्ट्र शासनाने ई-गव्हर्नन्सवर विशेष […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

लोकाभिमुख प्रशासनाच्या यशस्वीतेसाठी ई – गव्हर्नन्स उपयुक्त

ई – गव्हर्नन्स परिषदेतील विविध विषयांवरील चर्चासत्रातील सूर मुंबई, दि. २३ : शासनाच्या  लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आणि गतिमानतेने जनसेवा उपलब्ध करून देण्यात ई गव्हर्नन्स संकल्पना सर्वार्थाने उपयुक्त असल्याचे मत ई गव्हर्नन्स परिषदेतील विविध विषयांवरील चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा, सार्वजनिक तक्रार विभाग (डीएआरपीजी)आणि  राज्य शासनाच्या सहकार्याने, आयोजित करण्यात आलेल्या “ई-गव्हर्नन्स” […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मंत्रालयात ग्रंथप्रदर्शन व विविध कार्यक्रम

मुंबई, दि.२३ : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून दि. २३ ते २५ जानेवारी, २०२३ या कालावधीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आज दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सकाळी ११ ते दुपारी ४ या कालावधीत “चालता बोलता” या प्रश्नसरितेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, दि. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी डॉ. सतीश देशपांडे, डॉ. अभय वाघ यांची नियुक्ती

मुंबई, दि. २३ : महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याद्वारे डॉ. सतीश माधवराव देशपांडे व डॉ. अभय एकनाथ वाघ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीची अधिसूचना आज राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात आली आहे.